रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील असुर्डे धरणात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. धरणाच्या पाण्यात तीन मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे तिघेही काल धरण परिसरात लाकडासाठी गेलेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर आज सकाळी त्यांना धरणाच्या पाण्यात तीन मृतदेह तरंगताना दिसले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात सापडल्याने या तिघांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.
हेही वाचा - दाऊद इब्राहिमच्या लोटेतील मालमत्तेचा लिलाव, ग्रामस्थ रविंद्र कातेंनी जिंकली बोली