ETV Bharat / state

Refinery Project : रिफायनरी प्रकल्पाला भाजपचा पूर्ण पाठिंबा; विरोध केला तर... -  बावनकुळे

रिफायनरी प्रकल्पाला भाजप पूर्णपणे समर्थन ( BJP full support for refinery project ) करेल. कोणी विरोध केला तर समोर संघटनाही उभी करू असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) यांनी म्हटले आहे.

Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankule
author img

By

Published : Nov 25, 2022, 9:29 PM IST

Updated : Nov 25, 2022, 11:01 PM IST

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्प ( Refinery Project ) ज्या ठिकाणी ठरेल, त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पाला भाजपा पूर्णपणे संघटनात्मक समर्थन ( BJP full support for refinery project ) करेल. कोणी विरोध केला तर समोर संघटनाही उभी करू असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) यांनी म्हटले आहे. जर इच्छाशक्ती असेल तर जनतेचा विरोध हा संपवता येतो, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे, ते आज रत्नागिरीत बोलत होते.

रिफायनरी प्रकल्पाला भाजपचा पूर्ण पाठिंबा; विरोध केला तर... - बावनकुळे

प्रकल्पाबाबत जनतेला विचारात घेणार - यावेळी बावनकुळे म्हणाले, माझ्या आयुष्याचं नुकसान होतं असं जनतेला वाटतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे समाधान होईपर्यत समजवलं जाईल. सरकार जेव्हा नागरिकांच्या भावनांशी खेळतं, जेव्हा नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीत तेव्हा, नागरिकांचा विरोध होतो. काही राजकारणाकरता विरोध करतात. पण शिंदे - फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) जनतेच्या मनात काय आहे ते समजून घेणार आहे. या प्रकल्पाबाबत जनतेला काय वाटतं, हे समजवून घेईल, त्यामुळे कोणाचा विरोध होईल असं वाटत नाही बावनकुळे यावेळी म्हणाले.

प्रकल्पांचा फुटबॉल होतोय - रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आले पाहिजेत, युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. शिकलेला युवक हा रोजगाराला लागला पाहिजे, पण मागच्या अनेक काळापासून अनेक प्रकल्पांवरून इथे जे काही राजकारण होत आहे. एक प्रकारे प्रकल्पांचा फुटबॉल होत आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते सक्षम असल्याने आता कोणत्याही प्रकल्पाचा फुटबॉल होणार नाही. कोणीही कितीही कोणत्याही प्रकल्पाला विरोध केला तरी, आता कोकणावर अन्याय होणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री - महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray most inactive Chief Minister ) यांचं नाव गणलं जाईल अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 महिने मंत्रालय बघितलं नाही, फक्त फेसबुक लाईव्ह घेत बसले. कधी महाराष्ट्र दर्शन घेतलं नाही. केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कॅबिनेट झाल्या, त्यामुळे सर्वात निष्किय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे गणले जातील अशी टीका बावनकुळे यांनी यावेळी केली.

Last Updated : Nov 25, 2022, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.