रत्नागिरी : शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या पुतळ्याला पाणी पाजून भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला आहे. विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनी अशा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे.
भाजपकडून शिवसेनेचा निषेध
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात रविवारी भाजप कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कृतीचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून जोडे मारले. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे निलेश राणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.
मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित
भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, पदाधिकारी पिंट्या निवळकर, उपतालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण, मेहताब साखरकर, ययाती शिवलकर, रामा शेलटकर, अक्षय चाळके, अमर किर, शोएब खान, गुरुनाथ चव्हाण, रमाकांत आयरे, सर्वेश सावंत, पप्पू सरफरे, इंतिखाब पठाण, भाई परपते, मन्सूर मुकादम, वल्लभ सरफरे, मनोज तांडेल, आशु सावंत, साहिल पवार, विशाल पाटील, राजेश झगडे, महिला पदाधिकारी शोभा जिरोळे, विद्या सुर्वे, सोनल चाळके, जयश्री भंडारी आदी उपस्थित होते.