ETV Bharat / state

ई टीव्ही भारत विशेष : 'निसर्ग'मुळे कासवांचे गाव वेळासमधील जैवविविधता धोक्यात

author img

By

Published : Jul 9, 2020, 5:20 PM IST

वेळास हे रत्नागिरी जिल्ह्याचं शेवटचे टोक आहे. हा भाग दुर्लक्षित आहे. मात्र, कासवांचे गाव म्हणून वेळास गाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आले आणि गावात पर्यटन वाढीला लागले. शेती बरोबरच गावातील कासव महोत्सव, मासेमारी, नारळी-पोफळीच्या बागा, जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि अभ्यासकांच्या जीवावर वेळास गावाचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे येथील जैविविधता धोक्यात आली आहे.

Velas Village
वेळास गाव

रत्नागिरी - जून महिन्याच्या सुरुवातीला निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले. या चक्रीवादळाच्या तडाख्यात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. विविध प्रकारची लाखो झाडे उन्मळून पडली. त्यामुळे निसर्गाचे सौंदर्यचं या वादळाने हिरावून नेल्याचे चित्र आहे. अनेक गावांची वैशिष्ट्ये या वादळात हरवून गेली आहेत. मंडणगड तालुक्यातील वेळास या गावानेही निसर्ग चक्रीवादळात खूप काही गमावले आहे. स्थावर मालमत्तेचे नुकसान तर झालेच आहे, शिवाय लाखो झाडे जमिनदोस्त झाली आहेत. येथील जैवविविधतेवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

'निसर्ग'मुळे वेळासमधील जैवविविधता धोक्यात

वेळास हे कासवांचे गाव म्हणून नावारूपास आले होते. येथे होणाऱया कासव महोत्सवाच्या माध्यमातून या गावाची महती सातासमुद्रापार पोहचली आहे. मात्र, कासवांबरोबरच या गावाची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत. निसर्गाची भरभरून देण असलेल्या या गावात 150पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आढळतात. असंख्य किडे आणि वेगवेगळ्या जातीच्या फुलपाखरांचे हे निवासस्थान आहे, असे जैवविविधता अभ्यासक मोहन उपाध्ये सांगतात.

या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी अनेक विद्यार्थी, पर्यटक येथे येतात. मात्र, निसर्ग चक्रीवादळानंतर येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. पक्षी आणि फुलपाखरांचे निवासस्थान असणारी झाडेचं वादळात उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना राहण्यासाठी व खाण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेले नाही. अशा परिस्थितीत येथे पर्यटक आणि विद्यार्थी जैवविविधतेच्या अभ्यासासाठी येतील की नाही? असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

वेळास हे रत्नागिरी जिल्ह्याचं शेवटचे टोक आहे. हा भाग दुर्लक्षित आहे. मात्र, कासवांचे गाव म्हणून वेळास गाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आले आणि गावात पर्यटन वाढीला लागले. शेती बरोबरच गावातील कासव महोत्सव, मासेमारी, नारळी-पोफळीच्या बागा, जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि अभ्यासकांच्या जीवावर वेळास गावाचे अर्थकारण अवलंबून आहे. जर येथील जैवविविधताच पूर्ण नष्ट झाली तर अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल.

निसर्ग वादळामुळे रत्नागिरीतील अनेक गावे एक पिढी मागे गेली आहेत. चक्रीवादळाने उद्ध्वस्त केलेले सर्व उभे करण्यासाठी 20 ते 25 वर्ष लागतील. एकूणच या गावांची ओळख असलेली जैवविविधता धोक्यात आली असून नागरि जीवनावर देखील याचा परिणाम झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.