ETV Bharat / state

...यामुळे भास्कर जाधवांनी केले अजित पवारांचे सारथ्य !

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. मात्र, या सरकारमध्ये भास्कर जाधवांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्तही केली होती.

Ajit Pawar Ratnagiri tour visits at Bhaskar Jadhav home
अजित पवार रत्नागिरी दौरा भास्कर जाधव यांच्या घरी भेट
author img

By

Published : Mar 14, 2020, 2:47 PM IST

रत्नागिरी - उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी एका खासगी कारणास्तव रत्नागिरीतील चिपळूणमध्ये आले होते. त्यावेळी अजित पवारांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण स्वीकारले. त्यानुसार ते चिपळूणला पोहोचले. तेव्हा हेलिप‌ॅडपासून ते भास्कर जाधवांच्या घरापर्यंत स्वतः भारस्कर जाधव यांनी अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य केले. यावेळी गाडीमध्ये मंत्री जयंत पाटील हे देखील होते, त्यामुळे जाधवांच्या या सारथ्यामुळे सद्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांचा रत्नागिरी दौरा... भास्कर जाधव यांच्या घरी दिली भेट...

हेही वाचा... 'कोरोना'ची धास्ती! येरावडा कारागृहातील कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाकडून मास्कसह सॅनिटायझर

भास्कर जाधवांनी केले अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य...

चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्न समारंभानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्री जयंत पाटील, दत्ता भरणे यांच्यासह चिपळूण तालुक्यातील खरवते येथे सकाळी आले होते. त्यानंतर ते चिपळूण येथे आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी निमंत्रणावरुन स्नेहभोजनासाठी दाखल झाले. तत्पूर्वी चिपळूण हेलिपॅड येथे आगमन झाल्यावर भास्कर जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. आणि त्यांना स्वतः गाडी चालवत त्यांच्या 'सुवर्ण भास्कर' या निवासस्थानी घेऊन गेले. स्नेहभोजन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील मुंबईला रवाना झाले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेने प्रवेश केला होता. निवडणूकांनंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या या सरकारमध्ये भास्कर जाधव यांना मात्र मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे नाराज भास्कर जाधवांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्तही केली होती. त्यात आज राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य भास्कर जाधवांनी केल्यामुळे त्यांच्या या सारथ्याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा... ...तर अशा थिएटरवर राज्य सरकार कारवाई करेल - अजित पवार

चिपळूणमध्ये अजित पवारांनी हस्तांदोलन करणे टाळले...

अजित पवार हे शनिवारी चिपळूण येथे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर सुरुवातीला खरवते येथे आणि नंतर चिपळूणच्या पवन तलाव येथे उतरले. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. तसेच तेव्हा भास्कर जाधवांचे चिरंजीव विक्रम जाधव हे अजित पवारासोबत हस्तांदोलन करण्यासाठी पुढे गेले. अजित पवार यांनी मात्र त्यांच्यासोबत हस्तांदोलन करण टाळले आणि फक्त नमस्कार केला. राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेते आता हस्तांदोलन करण्याचे टाळत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.