ETV Bharat / state

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ.. सीलबंद म्हणून दिले बेसिनचे पाणी; जामनगर एक्सप्रेसमधील प्रकार - प्रवाशांना बेसिनचे पाणी

जामनगर एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रवाशाला सीलबंद पाणी म्हणून बेसिनचे पाणी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रवाशाने तक्रार केल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने रविंद्र व्यास या कंत्राटी कामगाराला ताब्यात घेतले.

सीलबंद पाणी
सीलबंद पाणी
author img

By

Published : Feb 5, 2020, 4:07 PM IST

रत्नागिरी - जामनगर एक्सप्रेसमध्ये एक कंत्राटी कामगार रेल्वेतील बेसिनच्या नळाचे पाणी सीलबंद पाणी म्हणून विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीला आला. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर या कामगाराची प्रवाशांनी टीसीकडे तक्रार केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रवींद्र व्यास या कंत्राटी कामगाराला ताब्यात घेतले.

सीलबंद पाणी म्हणून दिले बेसिनचे पाणी

जामनगर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने गाडीतील रवींद्र व्यास या विक्रेत्याला पाण्याची बाटली मागितली. त्याने पाण्याची बाटली आणून दिली. मात्र, त्याने दिलेले पाणी हे सीलबंद बाटलीतील नसून रेल्वेच्या बेसिनमधून भरले असल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले. रत्नागिरी स्थानकावर गाडी आल्यानंतर या प्रवाशाने रवींद्र व्यासची तक्रार रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली.

हेही वाचा - माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा
रवींद्र व्यासच्या विरोधात टीसीने तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) त्याच्यावर कारवाई करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. रवींद्र व्यास हा कंत्राटी कामगार खानपान सेवा देणाऱ्या ठेकेदाराचा अधिकृत विक्रेता होता का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, या प्रकारामुळे रेल्वेत मिळणारे सीलबंद बाटलीतील पाणी आणि खाद्यपदार्थ सुरक्षित आहे का? याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

Intro: बाटलीबंद पाणी म्हणून दिलं रेल्वेतीलच बेसीनच्या नळाचं पाणी

जामनगर एक्सप्रेसमधील प्रकार

कंत्राटी कामगार रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी, प्रतिनिधी

रेल्वे गाड्यांंतील बाटलीबंद पाणी सुरक्षित आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण आज (बुधवार) सकाळी कोकण रेल्वे मार्गावरील जामनगर एक्सप्रेसमध्ये एक कंत्राटी कामगार रेल्वेतील बेसिनच्या नळाचं पाणी भरून ते सीलबंद पाणी म्हणून विकत असताना एका प्रवाशाने त्याला पकडलं आहे. त्यानंतर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर या कामगाराची प्रवाशाने टीसीकडे तक्रार केली. या कामगाराला रेल्वे पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे. रवींद्र व्यास असं या कंत्राटी कामगाराचं नाव आहे.

जामनगर एक्सप्रेसमधूू प्रवास करणाऱ्या प्रवाशाने गाडीतील माणसाकडून पाण्याची बाटली मागितली. यावेळी त्याने पाण्याची बाटली आणून दिली, परंतु त्याने दिलेलं पाणी हे सीलबंद बाटलीतील नसून रेल्वेतील साधे पाणी भरले असल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले रत्नागिरी स्थानक आल्यावर या प्रवाशाने यासंबंधीची तक्रार रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे ही गाडी आज सकाळी अर्धा तास रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. संबंधित तरुणाच्या विरोधात टीसीने तक्रार दाखल केली त्यानंतर आरपीएफने त्याच्यावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे. संबंधित तरुणाचं नाव रवींद्र व्यास असून पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.हा कंत्राटी कामगार खानपान सेवा देणाऱ्या ठेकेदाराचा अधिकृत विक्रेता होता का? याबाबत तपास पोलिस करत आहेत.

मात्र या प्रकारामुळे रेल्वेतून मिळणारे सीलबंद बाटलीतील पाणी सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे?

बाईट - अजित मधाळे, पोलीस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) रत्नागिरी
Body:बाटलीबंद पाणी म्हणून दिलं रेल्वेतीलच बेसीनच्या नळाचं पाणी

जामनगर एक्सप्रेसमधील प्रकार

कंत्राटी कामगार रेल्वे पोलिसांच्या ताब्यातConclusion:बाटलीबंद पाणी म्हणून दिलं रेल्वेतीलच बेसीनच्या नळाचं पाणी

जामनगर एक्सप्रेसमधील प्रकार

कंत्राटी कामगार रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.