रायगड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी खबरदारीची पावले जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी उचलत आहेत. यासाठी शासन आणि प्रशासन जनतेने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी प्रयत्नशील आहे. वेगवगळे हातखंडे वापरुन नागरीकांनी घरातच रहावे, असे प्रयत्न जिल्हा आणि पोलीस प्रशासन करीत आहेत. असेच एक आवाहन रायगड पोलीस दलातील नेरळ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक असलेले बालाजी जाधव यांनी स्वतः लिहिलेले कोरोनावरील गीत आपल्या पहाडी आवाजात सादर करुन लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत.
कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाला मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी स्वत: हे गाणे तयार करून ते लोकप्रिय गाण्याच्या चालीवर गायिलेही आहे. बालाजी जाधव यांनी यापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना कार्यक्रम करून शासनाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांना अनेक कला भूषण, कवी भूषण, मंत्रालय वार्ता, असे सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत. बालाजी जाधव यांच्या गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.
हेही वाचा - ... म्हणून 'ते' रेल्वे रुळावरून पायी प्रवास करत आले खेडपर्यंत...