ETV Bharat / state

निवडणुकीचे अचूक भविष्य सांगा २१ लाख मिळवा, अंनिसचे ज्योतिषांना आव्हान - superstition

लोकप्रबोधनाचा हेतू ठेऊन हे आव्हान दिले असल्याचे अंनिसच्या तर्फे सांगण्यात आले. ज्योतिषांना दिलेल्या प्रश्नावलीत २५ प्रश्न असतील. यात लोकसभा निवडणुकीत पक्षांना मिळणाऱ्या जागा, उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्वाच्या मतदारसंघातील विजयी उमेदवार,असे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

अंनिसचे पदाधिकारी
author img

By

Published : Apr 13, 2019, 1:50 PM IST

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीचे अचूक भविष्य सांगा आणि २१ लाख मिळवा, असे जाहीर आव्हान अंधश्रद्धा निर्मुलन समितीने (अंनिस) ज्योतिषांना दिले आहे. याबाबत अंनिसने बुधवारी पत्रकार परिषद घेतली. हे आव्हान स्वीकारणाऱ्या ज्योतिषांना २५ प्रश्नांची प्रश्नावली पोस्टाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

अंनिसच्या पत्रकार परिषदेत बोलताना कार्याध्यक्ष अविनाश पाटील

देशभरात निवडणुका सुरू आहेत. त्याचबरोबर निवडणुकींचे निकाल सांगणाऱ्या ज्योतिषांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत. या अंधश्रद्धेविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय अंनिसने केला आहे. त्यासाठीच ज्योतिषांना जाहीर आव्हान देण्याचे त्यांनी ठरवले आहे. गेल्यावेळी देखील अंनिसने राज्यातील नामवंत ज्योतिषांना आव्हान दिले होते. हे आव्हान एकाही ज्योतिषाने स्वीकारले नव्हते.

लोकप्रबोधनाचा हेतू ठेऊन हे आव्हान दिले असल्याचे अंनिसच्या तर्फे सांगण्यात आले. ज्योतिषांना दिलेल्या प्रश्नावलीत २५ प्रश्न असतील. यात लोकसभा निवडणुकीत पक्षांना मिळणाऱ्या जागा, उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्वाच्या मतदारसंघातील विजयी उमेदवार, सर्वात जास्त मतांनी निवडून येणार उमेदवार, सर्वाधिक मताधिक्य मिळविणारी महिला उमेदवार, नोटा पर्यायाचा सर्वाधिक वापर करणार मतदारसंघ कोणते असे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

या पत्रकार परिषदेला समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्यवाह डॉ.नितीन शिंदे, ज्योतिष विश्लेषक प्रकाश घाटपांडे, जिल्हाध्यक्ष विनोद वायंगणकर उपस्थित होते.

Intro:लोकसभा निवडणूक

निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाख जिंका

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं ज्योतिषांना जाहीर आव्हान

रत्नागिरी/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीबाबत अचूक भाकीत सांगणाऱ्या ज्योतिषांना महाराष्ट्र अंनिसने आव्हान दिलं आहे.. 2019 लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख रुपये जिंका असं आव्हान देत आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली जाहीर केली आहे.. याबाबत बुधवारी (ता.१०) महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्यवाह डॉ.नितीन शिंदे, ज्योतिष विश्लेषक प्रकाश घाटपांडे, जिल्हाध्यक्ष विनोद वायंगणकर उपस्थित होते.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वादळ घुमत आहे. तर दुसरीकडे त्यांचे भविष्य सांगण्यासाठी भोंदुगिरीही सुरू आहे. त्यांचे हे भविष्य प्रसार माध्यमांमार्फत लोकांसमोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होते, असा संघटनेचा अनुभव आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या अशा वृत्तींविरोधात ठाम भुमिका घेण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तून बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे. महाराष्ट्र अंनिसतर्फे याबाबत २१ लाख रूपयांचे बक्षीस ठेवल्याचे पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही ही आव्हान प्रक्रिया राबवलेली होती. किंबहुना महाराष्ट्रातील स्वत:ला नामवंत म्हणवणाऱ्या ज्योतिषांना सदर आव्हान प्रक्रिया रजिस्टर पोस्टाने पाठवली होती. परंतू, एकाही ज्योतिषाने महाराष्ट्र अंनिसचे हे आव्हान त्यावेळी स्वीकारले नव्हते. त्यामुळे सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही समितीमार्फत हे आव्हान प्रक्रिया लोकप्रबोधनाचा हेतु नजरेसमोर ठेऊन, राबवली जात आहे. जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. या प्रश्नावलीत एकूण २५ प्रश्न असतील. लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांना मिळणाऱ्या जागा, निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्वाच्या मतदरसंघातील विजयी उमेदवार, सर्वात जास्त मताधिक्क्याने विजयी होणाऱ्या उमेदवाराचे नाव, सर्वाधिक मताधिक्य मिळविणारी महिला उमेदवार, नोटा पर्यायाचा सर्वाधिक वापर करणारा मतदारसंघ अशा स्वरूपाचे प्रश्न सदर प्रश्नावलीत असतील.
महाराष्ट्र अंनिसने दिलेले आव्हान ज्योतिषांनी वर्तवलेल्या भविष्याचा खरेपणा सिध्द करण्याची नामी संधी मानून स्वीकारावे, असे समितीच्यावतीने यावेळी सांगण्यात आले आहे. 
Byte -- अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष , महाराष्ट्र अंनिसBody:लोकसभा निवडणूक

निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाख जिंका

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं ज्योतिषांना जाहीर आव्हान
Conclusion:लोकसभा निवडणूक

निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाख जिंका

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं ज्योतिषांना जाहीर आव्हान
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.