रत्नागिरी- जिल्ह्यात सध्या पावसानं उसंत घेतली आहे. पण, जमीन खचण्याचे प्रकार मात्र सुरूच आहेत. रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी गावातील बौद्धवाडीमध्ये देखील जमिन खचली असून, जमिनीला तसेच घरांनाही भेगा पडल्या आहेत. त्यामुळे धोकादायक असलेल्या या भागातील 9 कुटुंबाना तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिल्या आहेत.
9 कुटुंबांना धोकाजुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात जिल्ह्यात ठीकठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी बौध्दवाडी येथेही डोंगर भागात गतवर्षी भेगा पडलेल्या होत्या. त्याठिकाणी एकुण 70 घरे आहेत आणि या भागातील डोंगराला काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. 2019 मध्ये या परिसरातील ज्या ठिकाणी भेगा पडलेल्या होत्या. त्या ठिकाणी काही प्रमाणात यावर्षी पुन्हा जमीन खचली आहे. तसेच काही ठिकाणी भेगांचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. या धोकादायक ठिकाणी 9 कुटुंब आहेत. त्यांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था नाही, त्यांची जवळच्या शाळेत व्यवस्था करण्यात येईल असे सबंधीतांना सांगण्यात आले आहे.
घरानांही भेगा पडल्याने 9 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना प्रशासनाने ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता2019 पासून हा प्रकार होत असून पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासन नोटीस देतं, त्यानंतर याबाबत कुणीही गांभीर्यानं पाहत नाही अशी प्रतिक्रिया इथल्या नागरिकांची आहे. त्यामुळे याबाबत ठोस पावलं उचलली जावी, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.