रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 23 पैकी 17 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसदारांना आज नैसर्गिक आपत्कालीन निधीमधून 6 नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात आली.
आज 23 पैकी 6 मृतांच्या वारसदारांना 4 लाखाचा धनादेश देण्यात आला. खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या उपस्थितीत तिवरे गावाच्या मंदिरात हे धनादेश देण्यात आले. मृतांच्या 26 नातेवाईकांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
4 लाखाचा धनादेश मिळालेली नावे
- शारदा बळीराम चव्हाण (मृत) - बळीराम कृष्णा चव्हाण (पती) यांना देण्यात आला धनादेश
- नंदाराम महादेव चव्हाण (मृत) - तानाजी नंदाराम चव्हाण (मुलगा) यांना देण्यात आला धनादेश
- रविंद्र तुकाराम चव्हाण (मृत) - प्रतिक रवींद्र चव्हाण (मुलगा) यांना देण्यात आला धनादेश
- संदेश विश्वास धाडवे (मृत) -- विश्वास महादेव धाडवे (वडील) यांना देण्यात आला धनादेश
- अनंत हरीभाऊ चव्हाण (मृत) - अजित अनंत चव्हाण (मुलगा) यांना देण्यात आला धनादेश
- राकेश अनिल घाणेकर (मृत) - समिक्षा राकेश घाणेकर (पत्नी) यांना देण्यात आला धनादेश