ETV Bharat / state

रत्नागिरीत संचारबंदीत बाहेर पडणाऱ्या मुजोर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई - कोविड-19 लेटेस्ट न्यूज़

जिल्ह्यात संचारबंदी असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या मुजोर वाहनचालकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरीत संचारबंदीतही बाहेर पडणाऱ्या मुजोर वाहनचालकांवर कारवाई

author img

By

Published : Mar 24, 2020, 11:59 AM IST

रत्नागिरी - राज्यात जमावबंदी लागू असतानाही नियमांचे पालन न करता घराबाहेर पडणाऱ्यांवर सोमवारी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एक दिवसात तब्बल ६ लाख २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रत्नागिरीत संचारबंदीतही बाहेर पडणाऱ्या मुजोर वाहनचालकांवर कारवाई

रविवारचा जनता कर्फ्यू यशस्वी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले. राज्यात १४४ कलम लागू असताना देखील नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यामध्ये रत्नागिरीकरही रिक्षा, कार, बाईक अशा मिळेल त्या वाहनानं बाहेर पडले. त्यामुळे कोरोनाबाबत किती गांभीर्य आहे, असा सवालदेखील निर्माण झाला. प्रशासनानं आवाहन केल्यानंतर देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. अखेर कायद्याची कडक अंमलबजावणी करत या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - संचारबंदीतही रत्नागिरीकर रस्त्यावर: दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात १६१४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामधून तब्बल ६ लाख २९ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये विनाहेल्मेट, लायसन्स नसणे, सिटबेल्ट न लावणे, कागदपत्रांची पूर्तता नसणे आदि कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर मात्र, हळूहळू रत्नागिरीतील रस्त्यांवर दिसणारी वाहनांची वर्दळ मात्र कमी होताना दिसून आली. दरम्यान, नियमांचं, आदेशाचं पालन करा, कायद्याचा सन्मान राखा, केवळ एका दिवसात कोरोनाला हरवता येणार नाही असे आवाहनदेखील यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले. त्यामुळे आता पुढील काळात रत्नागिरीकर कसा प्रतिसाद देतात, हे देखील पाहावं लागणार आहे.

हेही वाचा - लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी प्रयत्न - जिल्हाधिकारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.