रत्नागिरी - एलईडीद्वारे मासेमारी करण्यास बंदी आहे. असे असताना देखील नौकेवर एलईडी लावून मासेमारी करणाऱ्या गुहागर येथील नौकेसह नौका मालकावर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. कारवाई करताना नौकेवरील एलईडी साहित्य जप्त करण्यात आले आहे. मत्स्य विभागाच्या पथकाने आज (रविवार) ही कारवाई केली आहे.
एलईडीवर बंदी असतानाही एलईडीचा वापर
नौकेवर एलईडी लाईट बसवून मासेमारी करण्यास बंदी आहे . मंत्री अस्लम शेख यांनी नुकतेच नौकांवर कारवाईचे आदेश देखील दिले होते . यानुसार मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी येथील निलेश दगडु पाटील यांच्या मासेमार नौकेवर एलईडीचे साहित्य आढळून आले . या प्रकरणी नौका मालकावर म.सा.मा.नि. अधिनियम १९८१ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. नौकेवरील एल.ई.डी लाईट्स चे साहित्य जप्त केले असून अभिनिर्णय अधिकारी रत्नागिरी यांच्या पुढील आदेशापर्यंत नौका जयगड बंदरात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा-सिंधुदुर्गच्या सीमांवर आरोग्य विभागाची पथके तैनात, चाकरमान्यांची तपासणी
हेही वाचा-पाया नसलेले जयपूरचे हवामहल; ज्याला पाहताच होतो कृष्णाच्या मुकुटाचा भास