ETV Bharat / state

अंगावर वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, नांदळज बौद्धवाडीतील घटना - नांदळज बौद्धवाडी बातमी

मंगळवारी संध्याकाळी देवरूख जवळच्या नांदळज बौद्धवाडीत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान सुशांत आपल्या घराच्या बाहेरील पडवीत बसला होता. त्याचवेळी वीजेचा लोळ त्याच्या अंगावर पडला, त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अंगावर वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
author img

By

Published : Oct 9, 2019, 1:29 PM IST

रत्नागिरी - अंगावर वीज पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी देवरूख जवळच्या नांदळज बौद्धवाडी येथे घडली. सुशांत विश्वास कांबळे(१२) असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता सातवीमध्ये शिकत होता.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पावसाचे हजेरी लागत आहे. मंगळवारीही पावसाने जिल्ह्यात काहीशी अशीच सुरुवात केली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी विजांचा लखलखाट दिसत होता.

हेही वाचा - आमदार संजय कदम आणि सूर्यकांत दळवींना जनताच उत्तर देईल- योगेश कदम
मंगळवारी संध्याकाळी संगमेश्वर तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान संध्याकाळी नांदळज येथील सुशांत आपल्या घराच्या बाहेरील पडवीत बसला होता. त्याचवेळी वीजेचा लोळ त्याच्या अंगावर पडला. त्यानंतर नातेवाईकांनी सुशांतला तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात हलविलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात ३२ उमेदवार रिंगणात

Intro:वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

रत्नागिरी, प्रतिनिधी

वीज पडून 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देवरूख जवळच्या नांदळज बौद्धवाडी येथे घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. सुशांत विश्वास कांबळे असं या मुलाचं नाव आहे.
जिल्ह्यात गेले काही दिवस दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारीही पावसाने जिल्ह्यात काहीशी अशीच सुरुवात केली. काही ठिकाणी मुसळधार बरसात केली. तर काही ठिकाणी विजांचा लखलखाट दिसत होता. मंगळवारी संध्याकाळी संगमेश्वर तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी नांदळज येथील सुशांत आपल्या घराच्या बाहेरील पडवीत बसला होता, त्याचवेळी वीजेचा लोळ त्याच्या अंगावर पडला. त्यानंतर नातेवाईकांनी सुशांतला तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात हलविलं. मात्र मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सुुशांत ताम्हाणे शाळेत सातवीत शिकत होता. मात्र त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.. Body:वीज पडून विद्यार्थ्याचा मृत्यूConclusion:वीज पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.