रत्नागिरी - शहरातील झेरॉक्स सेंटरच्या शटरमध्ये सुमारे सहाफुट लांबीचा मोठा अजगर घुसून बसला होता. या अजगराला सर्पमित्रांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले.
बुधवारी सकाळी अजगर दिसताच दुकानधारकांची तारांबळ उडाली. झेरॉक्स सेंटरचे शटर उघडण्यास अडचण येत असल्याने दुकानदाराने शटरच्या वरच्या भागाची पाहणी केली. त्यावेळी त्या शटरमध्ये अजगर असल्याचे निदर्शनास आले. शटरमध्ये असलेला अजगर पकडण्यासाठी तत्काळ सर्पमित्रांना बोलावण्यात आले.
हेही वाचा - विवेक सोहनींना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून 'आंतरराष्ट्रीय पंच' पदवी प्रदान
दुकानात अडकलेला अजगर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. या अजगराला बाहेर काढण्यासाठी सर्पमित्रांनी दीड तास प्रयत्न केले. त्याला पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी नेण्यात आले.
हा अजगर भक्ष्याच्या शोधात गटारीतून वरती आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.