रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच गेल्या 24 तासांत तब्बल 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चोवीस तासात सर्वाधिक मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. 11 जणांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा दोनशे पार गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत चालला आहे. गेले काही दिवस दररोज 60 ते पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यातच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासांत तर जिल्ह्यात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 209 वर पोहोचला आहे. सद्या जिल्ह्यातील मृत्यू दर 3.16 टक्के एवढा झाला आहे.
दरम्यान, कोरोना मृत्यू वाढत असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांत आणखी नव्या 69 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 605 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4 हजार 514 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा - गायब झालेल्या श्वानाच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् धक्काच बसला...