रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. जिल्ह्यात काल 499 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर तब्बल 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा - रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सुबोध मेडसीकर यांची नियुक्ती
जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. काल आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 499 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 23 हजार 302 वर जाऊन पोहचली आहे. काल आलेल्या अहवालात 199 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत, तर 300 रुग्ण अॅटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
काल पॉझिटिव्ह आलेल्या 499 रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 174, दापोली 32, खेड 65, गुहागर 51, चिपळूण 73, संगमेश्वर 51, राजापूर 25 आणि लांजा तालुक्यात 28 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात काल 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 681 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर 2.92 टक्के आहे.
हेही वाचा - राजापूरमधील उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन