रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या 17 दिवसांच्या दोन बालकांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी या दोन्ही बालकांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप दिला.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसूती वार्डमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला होता. यात प्रसुती झालेल्या सहा महिलांना कोरोनाची लागण झाली होती. दोन नवजात बालकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ती अवघ्या सात दिवसांची नवजात बालके होती. मात्र, आता बालकांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतरचे त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे तसेच जिल्हा रुग्णालयातील इतर स्टाफ देखील हजर होता.