ETV Bharat / state

रायगडमध्ये तलावात बुडून तरुणाचा मृत्यू - खोपोली

ललित पुरोहित हा आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या ३ मित्रांसह विरेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तलावात पोहताना मध्यभागी गेल्यानंतर तलावात असणाऱ्या शेवळात ललित अडकला.

मृत तरुण
author img

By

Published : Jun 3, 2019, 12:47 PM IST

Updated : Jun 3, 2019, 2:00 PM IST

रायगड - खोपोली शहरात असलेल्या विरेश्वर तलावात एकजण बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. ललित राज पुरोहित (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी गर्भवती असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुणाचा मृतदेह बाहेर काढताना बचाव पथक

ललित पुरोहित हा आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या ३ मित्रांसह विरेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तलावात पोहताना मध्यभागी गेल्यानंतर तलावात असणाऱ्या शेवळात ललित अडकला. शेवळात अडकल्याने तो बुडू लागला. त्यावेळी त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, शेवळात अडकल्यामुळे त्याला वाचवणे शक्य झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने येऊन ललितला शोधायला सुरुवात केली होती. मात्र, शेवाळ मोठ्या प्रमाणात असल्याने त्याला शोधण्यात अडचण येत होती. शेवटी जवळपास दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश मिळाले. ललितच्या पश्चात पत्नी, ५ वर्षांचा मुलगा आहे.

खोपोली शहरातील विरेश्वर तलावात तरुण बुडाला

तलावातील शेवाळाने तरुणाचा घेतला जीव

रायगड - खोपोली शहरात असलेल्या विरेश्वर तलावात एकजण बुडाल्याची घटना आज सकाळी घडली. ललित राज पुरोहित (35) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह शोधण्याची शोध मोहीम बचाव गटाकडून सुरू आहे. मात्र तलावात असलेल्या शेवाळामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.

आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ललित पुरोहित हा आपल्या तीन मित्रांसह विरेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तलावात पोहताना मध्यभागी गेल्यानंतर तलावात असणाऱ्या शेवळात ललित हा अडकला. शेवळात अडकल्याने तो बुडू लागला. त्यावेळी त्याच्या मित्राने त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र शेवळात अडकल्यामुळे वाचविणे शक्य झाले नाही.

ही घटना कळताच स्थानिक बचाव टीमने येऊन ललित याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र शेवाळ मोठ्या प्रमाणात असल्याने मृतदेह शोधण्यात अडचण येत आहे. ललित याच्य पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा तसेच त्याची पत्नी सध्या गरोदर आहे. या आकस्मिक घटनेमुळे पुरोहित कुटूंबावर दुःखाची छाया पसरली आहे.
Last Updated : Jun 3, 2019, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.