ETV Bharat / state

गावाने वाळीत टाकल्यामुळे 'तिचा' आत्महत्येचा प्रयत्न, त्वरित उपचारामुळे वाचला जीव - raigad news

चक्क निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्याच एका निष्पाप विवाहित मुलीचा जीव जाण्याची वेळ आली होती. मात्र, सुदैवाने तिच्यावर योग्यवेळी उपचार झाल्याने या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

गावाने वाळीत टाकल्यामुळे 'तिचा' आत्महत्येचा प्रयत्न, त्वरित उपचारामुळे वाचला जीव
author img

By

Published : Nov 5, 2019, 7:02 AM IST

रायगड - जिल्ह्यातील मुरुड येथील वाळीत प्रकरण राज्यात गाजल्यानंतर पुन्हा एकदा वाळीत प्रकरणाने डोके वर काढले आहे. चक्क निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्याच एका निष्पाप विवाहित मुलीचा जीव जाण्याची वेळ आली होती. मात्र, सुदैवाने तिच्यावर योग्यवेळी उपचार झाल्याने या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. पिंकी संदीप मांगे, (२९) असे या विवाहित महिलेचे नाव आहे.

नागोठणे पोलीस ठाण्यातुन निवृत्त झालेले हशा नामा हंभीर हे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. निवृत्तीनंतर ते सुधागड तालुक्यातील उंबरगाव या आदिवासी वाडीवरील मूळ गावी राहण्यास गेले होते. राजकीय भांडणातून हशा हंभीर यांच्या कुटूंबाला दीड वर्षांपासून गावातील पंचांनी वाळीत टाकले होते. त्यामुळे गावातील कोणीही व्यक्ती त्याच्या सुखदुःखात त्याच्याकडे येत नव्हते. धार्मिक कार्यात पूर्वी ग्रामस्थ उपस्थित राहत होते. मात्र, आता कोणीही त्याच्याकडे येत नाहीत.

पिंकी संदीप मांगे यांची प्रतिक्रिया

हशा हंभीर यांची कन्या पिंकी हिचे गावातील मंगेश मांगेशी लग्न झाले आहे. त्यांना 3 मुलेही आहेत. उदरनिर्वाहासाठी पिंकी यांनी गावात छोटेसे दुकान टाकले आहे. मात्र, त्यांच्या आई वडिलांना वाळीत टाकले असल्याने त्यांच्या दुकानातही कोणी येत नाही. 4 नोव्हेबर रोजी मुलांना बाहेर खेळण्यास पाठविले असता मुले खेळत नसून तुम्ही आमच्याबरोबर खेळायला आलात तर आमच्या पालकांना 500 रुपये दंड पडेल, असे त्यांच्या चिमुकल्या मुलांनी सांगितल्यावर पिंकी यांना तणाव सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी घरातील फिनाईल पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरच्या लोकांनी तातडीने त्यांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्वरित उपचार करून तिचे प्राण वाचविले.

वाळीत प्रकरणाबाबत निवृत्त पोलीस कर्मचारी हशा हंभीर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा यासाठी अर्ज केला आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यावरच ही वेळ आल्याने प्रशासन याबाबत आता काय पाऊल उचलणार, याकडे लक्ष लागले आहे

एखादया कुटूंबाला वाळीत टाकणे त्यांना बहिष्कृत करणे, अशी प्रकरणे जिल्ह्यात अनेक झाली आहेत. त्याबाबत शासनाने कायदा केला आहे. मात्र, तरीही रूढी, परंपरा, राजकीय दबाव या चक्रव्हूहात अडकलेला समाज आजही समाज बहिष्कृत प्रकरण करण्यास धजावत आहे, ही शोकांतिका आहे.

Intro:
वाळीत प्रकरणामुळे तिने उचलले जीवन संपविण्याचे पाऊल

सुधागड तालुक्यातील उंबरगाव मधील घटना

त्वरित उपचारामुळे वाचले प्राण

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबालाच टाकले वाळीत

रायगड : जिल्ह्यातील मुरुड येथील वाळीत प्रकरण राज्यात गाजल्यानंतर पुन्हा एकदा वाळीत प्रकरणाने डोके वर काढले असून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या एका निष्पाप विवाहित मुलीचा जीव जाण्याची वेळ आली होती. मात्र सुदैवाने तिच्यावर योग्यवेळी उपचार झाल्याने तीन चिमुकल्याच्या आईचा जीव वाचला आहे. पिंकी संदीप मांगे, (29) असे या विवाहित तरुणीचे नाव आहे. वाळीत प्रकरणाबाबत निवृत्त पोलीस कर्मचारी हशा हंभीर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा यासाठी अर्ज केला आहे. मात्र पोलीस कर्मचाऱ्यावरच ही वेळ आल्याने प्रशासन याबाबत आता काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागले आहे

Body:नागोठणे पोलीस ठाण्यातुन निवृत्त झालेले हशा नामा हंभीर यांची पिंकी मांगे ही कन्या. निवृत्तीनंतर हशा हंभीर हे सुधागड तालुक्यातील उंबरगाव या आदिवासी वाडीवरील मूळ गावी राहण्यास गेले होते. राजकीय भांडणातून हशा हंभीर यांच्या कुटूंबाला दीड वर्षांपासून गावातील पंचांनी वाळीत टाकले होते. त्यामुळे गावातील कोणीही व्यक्ती त्याच्या सुखदुःखात त्याच्याकडे येत नव्हते. धार्मिक कार्यात पूर्वी ग्रामस्थ उपस्थित राहत होते. मात्र आता कोणीही त्याच्याकडे येत नाहीत.

हशा हंभीर यांची कन्या पिंकी हिचे गावातील मंगेश मांगे ह्याच्याशी लग्न झाले असून त्यांना तीन मुले आहेत. उदरनिर्वाहासाठी पिंकी हिने गावात छोटेसे दुकान टाकले आहे. मात्र आई वडिलांना वाळीत टाकले असल्याने दुकानातही कोणी येत नाही. 4 नोव्हेबर रोजी मुलांना बाहेर खेळण्यास पाठविले असता मुले खेळत नसून तुम्ही आमच्याबरोबर खेळायला आलात तर आमच्या पालकांना पाचशे रुपये दंड पडेल असे तिच्या चिमुकल्या मुलांनी आईला सांगितले.
Conclusion:पिंकी हिने मुलाच्या तोंडून हे ऐकल्यावर तिने घरातील फिनेल पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरच्या लोकांनी तातडीने तिला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्वरित उपचार करून तिचे प्राण वाचविले.

एखादया कुटूंबाला वाळीत टाकणे त्यांना बहिष्कृत करणे अशी प्रकरणे जिल्ह्यात अनेक झाली असून त्याबाबत शासनाने कायदा केला आहे. मात्र तरीही रूढी, परंपरा, राजकीय दबाव या चक्रव्हूहात अडकलेला समाज आजही समाज बहिष्कृत प्रकरण करण्यास धजावत आहे ही शोकांतिका आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.