रायगड - कोरोना विषाणूने महाभयंकर रुप धारण केले आहे. त्यातच या महाभयंकर विषाणूने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याने लाखो जीव सुध्दा घेतल्याचे पाहायला मिळाले. असंख्य रुग्ण या कोरोना विरोधात झुंज देत आहे. अनेकांना इतरही आजार असल्याने कोरोना अधिक तीव्रतेने परिणाम करतो. परंतु खालापूर तालुक्यातील ग्रामीण बीडखुर्द गावातील मनिषा शत्रुघ्न्य कर्णुक (45) या महिलेने घश्याचा कँन्सर असतानाही यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.
महिलेच्या इच्छाशक्तीला सलाम -
कोरोना विषाणूची लागण झाल्यावर अनेकांचे मनोधैर्य खचून जाऊन कोरोनाच्या धास्तीने अनेकांच्या प्रकृती बिघाड होत आहे, तर अनेकांनी कोरोनाला न डगमगता कोरोनाशी झुंज देत कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक जण या भीतीपायी मृत्यूमुखीदेखील पडले आहेत.
हेही वाचा - धक्कादायक! दिल्लीत २३ कोरोनाबाधितांनी रुग्णालयामधून काढला पळ