ETV Bharat / state

धक्कादायक..! तरुणाने एचआयव्हीग्रस्त असल्याचे लपवून केला विवाह, अन्... - HIV patient in Panvel

तक्रारदार तरुणीही आजारी पडल्याने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अहवालात ती सुद्धा एचआयव्हीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

HIV
एचआयव्ही
author img

By

Published : Jan 14, 2020, 8:46 PM IST

Updated : Jan 15, 2020, 5:46 PM IST

पनवेल - लग्नाआधी ज्याप्रमाणे पत्रिका तपासली जाते त्याचप्रमाणे आरोग्य पत्रिका तपासून घेणे आजच्या काळाची गरज बनली आहे. परंतु, लग्नाआधी आरोग्य चाचणी करण्याची गरज नाही, असा पवित्रा आजही अनेकांचा असतो. आरोग्य चाचणी गांभीर्याने न घेता लग्न केल्याने पनवेलच्या कामोठेतल्या एका मुलीला लग्नानंतर एचआयव्हीची लागण झाली आहे. त्यामुळे लग्नाआधीपासूनच एचआयव्ही असल्याची बाब लपवून या मुलीशी लग्न करणाऱ्या पतीविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - पेणमधील मुलांनी २३३ किलोमीटरचे अंतर पोहून नोंदवला विक्रम

पनवेल परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह कल्याण येथील तरुणाशी 2016 मध्ये झाला. विवाहानंतर पतीच्या प्रकृतीविषयी काही नातेवाईकांनी चौकशी सुरू केली होती. त्यात त्याला काही नातेवाईक आणि कुटुंबीय औषध घेण्याची आठवण करून देत होते. त्याच्या जेवणाविषयीही कुटुंबातील काही लोक अधिक काळजी घेत होते. याबद्दल तक्रारदार तरुणीने चौकशी सुरू केली. तिचा पती नेमकी कोणत्या प्रकारची औषधे घेतो, वा त्यांच्या जेवणाविषयी अधिक खबरदारी का घेतली जात आहे? याबद्दल तरुणीने विचारणा केली. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी तिला प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा - 55 वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा अलिबागमध्ये सुरू

त्यानंतर काही दिवसांनी पती खूपच आजारी पडल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी तो एचआयव्हीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. यावर तरुणीने संताप व्यक्त केल्यावर तिला कुटुंबातील सदस्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. उलट याची कोठेही वाच्यता केल्यास परिणाम भोगावे लागतील, असे धमकावण्यात आले.

दरम्यान, तक्रारदार तरुणीही आजारी पडल्याने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. वैद्यकीय अहवालात ती सुद्धा एचआयव्हीग्रस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी या साऱ्या प्रकाराची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे तरुणीने सांगितले.

Intro:सोबत बाईट्स आणि व्हिज्युअल जोडले आहेत.

पनवेल

लग्नाआधी ज्याप्रमाणे पत्रिका तपासली जाते त्याचप्रमाणे आरोग्य पत्रिका तपासून घेणं आजच्या काळाची गरज बनली आहे. परंतु लग्नाआधी हेल्थ टेस्ट करण्याची गरज नाही असा पवित्रा आजही अनेकांचा असतो. हेल्थ टेस्टचं गांभीर्य न घेता लग्न केल्यानं पनवेलच्या कामोठेतल्या एका मुलीला लग्नानंतर एचआयव्हीची लागण झाल्यानं तिच्यावर मोठं संकट कोसळलंय. लग्नाआधीपासूनच एचआयव्ही असल्याची बाब लपवून या मुलीशी लग्न करणाऱ्या पतीविरोधात नुकताच कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. Body:पनवेल परिसरात राहणाऱ्या एका युवतीचा विवाह कल्याण येथील तरुणाशी २०१६ मध्ये झाला. विवाहानंतर पतीच्या प्रकृतीविषयी काही नातेवाईकांनी चौकशी सुरू केली होती. त्यात त्याला काही नातेवाईक आणि कुटुंबीय औषध घेण्याची आठवण करून देत होते. त्याच्या जेवणाविषयीही कुटुंबातील काही लोक अधिक काळजी घेतले जात होते. याबद्दल तक्रारदार तरुणीने चौकशी सुरू केली. तिचे पती नेमकी कोणत्या प्रकारची औषधे घेतात वा त्यांच्या जेवणाविषयी अधिक खबरदारी का घेतली जात आहे, याबद्दल तरुणीने विचारणा केली. मात्र कुटुंबातील सदस्यांनी तिला प्रतिसाद दिला नाही.

Conclusion:काही दिवसांपूर्वी पती खूपच आजारी पडल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्या वेळी तो एचआयव्हीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. यावर फिर्यादीने संताप व्यक्त केल्यावर तिला कुटुंबातील सदस्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. उलट याची कोठेही वाच्यता केल्यास परिणाम भोगावे लागतील, असे धमकावण्यात आले. दरम्यान तक्रारदार तरुणीही आजारी पडल्याने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. वैद्यकीय अहवालात तीसुद्धा एचआयव्हीग्रस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी या साऱ्या प्रकाराची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे तरुणीने सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
Last Updated : Jan 15, 2020, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.