ETV Bharat / state

महाडमध्ये शस्त्रसाठा जप्त, एकास अटक

महाड पोलिसांकडून रात्रीच्या वेळी कॉम्बिग ऑपरेशन करण्यात येत होते. यावेळी राधिका लॉज येथे आरोपी बावनसिंग हा संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये ५१० धारदार शस्त्र आढळून आली.

आरोपीसह जप्त केलेला शस्त्रसाठा
author img

By

Published : Apr 6, 2019, 8:38 AM IST

Updated : Apr 6, 2019, 1:03 PM IST

रायगड - शहरातील राधिका लॉज परिसरात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

बावन सिंग सोनूसिंग असे आरोपीचे नाव आहे. महाड पोलिसांकडून रात्रीच्या वेळी कॉम्बिग ऑपरेशन करण्यात येत होते. यावेळी राधिका लॉज येथे आरोपी बावनसिंग हा संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये ५१० धारदार शस्त्र आढळून आली. याची किंमत जवळपास २० हजार रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नाका, लॉजची तपासणी सुरू आहे. हा आरोपी एवढा शस्त्रसाठा घेऊन महाडमध्ये कशासाठी आला होता? याबाबत महाड शहर पोलीस तपास करीत आहेत.

Intro:रायगडात महाड मध्ये सापडला शस्त्रसाठा, एकास अटक

रायगड : महाड शहर पोलिसांनी संशयास्पद सुरे हे शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास पकडले आहे. बावन सिंग सोनूसिंग टाक रा. निपाणी असे पोलिसांनी पकडलेल्या इसमाचे नाव आहे. बावनसिंग याच्याकडे 510 सुरे असलेला शस्त्रसाठा सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी दिली आहे. निवडणूक काळात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेला शस्त्रसाठा कशासाठी आणला आहे याबाबत पोलीस माहिती घेत आहेतBody:महाड शहरात महाड शहर पोलीस रात्रीच्या वेळी लॉजेसचे कॉम्बिग ऑपरेशन करीत असताना राधिका लॉजच्या ठिकाणी पंजाबी आरोपी बावनसिंग हा संशयित रित्या आढळून आला. त्याच्या रूमची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या गोणीमध्ये 510 सुरे आढळण्यात आले. याची किंमत वीस हजार रुपये एवढी असून आरोपी वितोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून नाका, लॉजेस याची तपासणी सुरू आहे. महाड मध्ये भेटलेला हा आरोपी एवढा शस्त्रसाठा घेऊन कशासाठी आला होता. याबाबत महाड शहर पोलीस तपास करीत आहेत.
Last Updated : Apr 6, 2019, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.