पनवेल: आपण रणगाडे निर्माण करू शकतो मात्र पाणी निर्माण करू शकतं नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या न्हावा शेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50 माणसांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर पाळून हा भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
माणसाने प्रगती केली असल्याचे आपण नवीन नवीन तंत्र विकसित केले आहे मात्र अजूनही पाणी निर्माण करू शकलो नाही. हे सत्य स्वीकारणे गरजेचे आहे.जे पाणी आपल्या हाताशी आहे ते जपणंही महत्वाचे आहे. जस अर्थ नियोजन करणे महत्वाचे आहे त्याप्रमाणे पाण्याचे नियोजन करणेही अंत्यत महत्वाचे आहे. तसेच वनसंपदा तोडून जीवघेणा विकास नकोच. विकासासाठी निर्माण केलेल्या कारखान्यामुळे प्रदूषण वाढतं आहे. झाडे तोडल्यामूळे पाण्याची पातळीही खाली जात आहे.सर्व विकार पाण्यातून होत असल्याने शुद्ध पाणी पिणे महत्वाचे आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका, याकरिता नियमांचे पालन करा, असे अवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी केले. याशिवाय भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत. पाण्याचा थेंब न थेंब साठविणे गरजेचे आहे. लोकांना जल साक्षर करण्याची आता वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले.
आपण रणगाडे निर्माण करू शकतो पण पाणी निर्माण करू शकत नाही- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - उद्धव ठाकरे बातमी
माणसाने प्रगती केली असल्याचे आपण नवीन नवीन तंत्र विकसित केले आहे मात्र अजूनही पाणी निर्माण करू शकलो नाही. हे सत्य स्वीकारणे गरजेचे आहे.जे पाणी आपल्या हाताशी आहे ते जपणंही महत्वाचे आहे. जस अर्थ नियोजन करणे महत्वाचे आहे त्याप्रमाणे पाण्याचे नियोजन करणेही अंत्यत महत्वाचे आहे.
![आपण रणगाडे निर्माण करू शकतो पण पाणी निर्माण करू शकत नाही- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे CM Maharashtra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10865007-433-10865007-1614848551506.jpg?imwidth=3840)