ETV Bharat / state

अलिबाग मतदार संघात 4 नवीन मतदान केंद्र: 375 मतदान केंद्रांवर होणार मतदान

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना उद्या शुक्रवारी जाहीर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोवार यांनी आज पत्रकार परीषद घेतली. अलिबाग व मुरुड हे दोन तालुके तसेच रोहा तालुक्‍यातील चणेरा महसूल मंडळ असा हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघ आहे.

अलिबाग मतदार संघात 4 नवीन मतदान केंद्र
author img

By

Published : Sep 26, 2019, 9:32 PM IST

रायगड- अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या मतदारांना सोयीचे व्‍हावे यासाठी मतदान केंद्रांच्‍या संख्‍येत वाढ करण्‍यात येणार आहे. सध्‍या 371 मतदान केंद्र असून आणखी 4 मतदान केंद्र नव्‍याने प्रस्‍तावित करण्‍यात आली आहेत, अशी माहिती अलिबाग विधानसभा मतदार संघाच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी दिली.

अलिबाग मतदार संघात 4 नवीन मतदान केंद्र

हेही वाचा-धनंजय मुंडेंबाबत सुरेश धसांनी केलं मोठं विधान; म्हणाले...

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना उद्या शुक्रवारी जाहीर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अलिबाग व मुरुड हे दोन तालुके तसेच रोहा तालुक्‍यातील चणेरा महसूल मंडळ असा हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघ आहे. यावेळी मतदार संघात टिटवी, म्‍हसाडी, गायचोळ आणि रुईशेत गावठण, अशी चार नवीन मतदान केंद्र प्रस्‍तावित करण्‍यात आली आहेत. त्‍यामुळे यावेळी 375 मतदान केंद्रांवर मतदान घेण्‍यात येईल.

या मतदार संघात 2 लाख 93 हजार 962 मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावतील. त्‍यातील अलिबाग तालुक्‍यात 2 लाख 6 हजार 907, मुरुड तालुक्‍यात 63 हजार 467 मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्‍या 1 लाख 45 हजार 919 इतकी असून महिला मतदारांची संख्‍या 1 लाख 48 हजार 43 आहे. पुरुषांच्‍या तुलनेत महिला मतदार अधिक आहेत. 1 हजार 697 दिव्‍यांग मतदार असून त्‍यात अंध 166, मुकबधिर 166, अस्‍थीव्‍यंग 571 व इतर 794 मतदारांचा समावेश आहे. यातील अंध मतदारांना ब्रेललिपीतील मतपत्रिका पुरवल्‍या जाणार आहेत. एकूण मतदारांपैकी 2 लाख 86 हजार 149 मतदारांना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पुरवण्‍यात आले आहे. तर 7 हजार 813 मतदारांना ओळखपत्र देणे बाकी आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत पार पडावी यासाठी पोलीसांसह 2 हजार 534 कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. 42 क्षेत्रीय अधिकारी असतील. अलिबागचे तहसिलदार सचिन शेजाळ, मुरुडचे तहसिलदार गमन गावीत व मुरुड नगर पालिकेचे मुख्‍याधिकारी अमित पंडित हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून काम पाहणार आहेत. 5 आचारसंहिता पथके, 5 भरारी पथके तर मांडवा, पोयनाड, साळाव आणि कुदे येथे अशी 4 स्थिर सर्वेक्षण पथके तैनात असतील. याशिवाय 5 व्हिडिओ सर्वेक्षण व 1 व्हिडिओ पाहणी पथक सज्‍ज असेल. कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रतिबंधात्‍मक कारवाई करण्‍यात येत आहे. हद्दपारीचे 9 प्रस्‍ताव आले असून 2 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्‍यात आली आहे.

विशेष मतदान केंद्र-
जास्‍तीत जास्‍त मतदान व्‍हावे यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्‍यासाठी वरसोली येथील प्राथमिक शाळेत आदर्श मतदान केंद्र असेल. तेथे मतदारांचे गुलाबपुष्‍प देवून स्‍वागत केले जाईल. तर आरसीएफ शाळेतील दोन मतदान केंद्र शक्‍ती मतदान केंद्र असतील तेथे सर्व अधिकारी कर्मचारी महिला असतील. 1 दिव्‍यांग संचलित मतदान केंद्रही असणार आहे. याशिवाय निवडक मतदान केंद्रांवर सेल्‍फी पॉईंटही असतील. ही सर्व मतदान केंद्र सजवण्‍यात येणार आहेत. राजकीय पक्षांच्‍या बैठका घेवून त्‍यांना आवश्‍यक त्‍या सर्व सुचना देण्‍यात आल्‍या आहेत. मतदारांनी, राजकीय पक्षांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेवून मतदान शांततेत, सुरळीत पार पडेल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शारदा पोवार यांनी केले आहे.

Intro:
अलिबाग मतदार संघात 4 नवीन मतदान केंद्र

मतदारांच्‍या सुविधेसाठी निर्णय , एकूण 375 केंद्रांवर होणार मतदान

रायगड : अलिबाग मुरूड विधानसभा मतदार संघात दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या मतदारांना सोयीचे व्‍हावे यासाठी मतदान केंद्रांच्‍या संख्‍येत वाढ करण्‍यात येणार आहे. सध्‍या 371 मतदान केंद्र असून आणखी 4 मतदान केंद्र नव्‍याने प्रस्‍तावीत करण्‍यात आली आहेत, अशी माहिती अलिबाग विधानसभा मतदार संघाच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी दिली.

विधानसभा निवडणूकीची अधिसूचना उद्या शुक्रवारी जाहीर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोवार यांनी आज पत्रकार परीषद घेतली. अलिबाग व मुरूड हे दोन तालुके तसेच रोहा तालुक्‍यातील चणेरा महसूल मंडळ असा हा अलिबाग मुरूड विधानसभा मतदार संघ आहे. यावेळी मतदार संघात टिटवी, म्‍हसाडी, गायचोळ आणि रूईशेत गावठण अशी चार नवीन मतदान केंद्र प्रस्‍तावीत करण्‍यात आली आहेत. त्‍यामुळे यावेळी 375 मतदान केंद्रांवर मतदान घेण्‍यात येईल.Body:1 हजार 697 दिव्‍यांग मतदार  

या मतदार संघात 2 लाख 93 हजार 962 मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावतील. त्‍यातील अलिबाग तालुक्‍यात 2 लाख 6 हजार 907, मुरूड तालुक्‍यात 63 हजार 467 मतदार आहेत. पुरूष मतदारांची संख्‍या 1 लाख 45 हजार 919 इतकी असून महिला मतदारांची संख्‍या 1 लाख 48 हजार 43 आहे. पुरूषांच्‍या तुलनेत महिला मतदार अधिक आहेत. 1 हजार 697 दिव्‍यांग मतदार असून त्‍यात अंध 166, मुकबधिर 166, अस्‍थीव्‍यंग 571 व इतर 794 मतदारांचा समावेश आहे. यातील अंध मतदारांना ब्रेललिपीतील मतपत्रिका पुरवल्‍या जाणार आहेत. एकूण मतदारांपैकी 2 लाख 86 हजार 149 मतदारांना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पुरवण्‍यात आले आहे तर 7 हजार 813 मतदारांना ओळखपत्र देणे बाकी आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत पार पडावी यासाठी पोलीसांसह 2 हजार 534 कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. 42 क्षेत्रीय अधिकारी असतील. अलिबागचे तहसिलदार सचिन शेजाळ, मुरूडचे तहसिलदार गमन गावीत व मुरूड नगर पालिकेचे मुख्‍याधिकारी अमित पंडित हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून काम पाहणार आहेत. 5 आचारसंहिता पथके, 5 भरारी पथके तर मांडवा, पोयनाड, साळाव आणि कुदे येथे अशी 4 स्थिर सर्वेक्षण पथके तैनात असतील याशिवाय 5 व्हिडिओ सर्वेक्षण व 1 व्हिडिओ पाहणी पथक सज्‍ज असेल. कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रतिबंधात्‍मक कारवाई करण्‍यात येत आहे. हद्दपारीचे 9 प्रस्‍ताव आले असून 2 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्‍यात आली आहे.Conclusion:विशेष मतदान केंद्र

जास्‍तीत जास्‍त मतदान व्‍हावे यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्‍यासाठी वरसोली येथील प्राथमिक शाळेत आदर्श मतदान केंद्र असेल. तेथे मतदारांचे गुलाबपुष्‍प देवून स्‍वागत केले जाईल. तर आरसीएफ शाळेतील दोन मतदान केंद्र शक्‍ती मतदान केंद्र असतील तेथे सर्व अधिकारी कर्मचारी महिला असतील. 1 दिव्‍यांग संचलीत मतदान केंद्रही असणार आहे. याशिवाय निवडक मतदान केंद्रांवर सेल्‍फी पॉईंटही असतील. ही सर्व मतदान केंद्र सजवण्‍यात येणार आहेत.

राजकीय पक्षांच्‍या बैठका घेवून त्‍यांना आवश्‍यक त्‍या सर्व सुचना देण्‍यात आल्‍या आहेत. मतदारांनी, राजकीय पक्षांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेवून मतदान शांततेत, सुरळीत पार पडेल यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शारदा पोवार यांनी केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.