खालापूर(रायगड) - पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढल्याने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावरून कडक नियम लावण्यात येत आहेत. सण - उत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक नियमावली लावण्यात आली आहे. तर खालापूर तालुक्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. होळी - धुलवड - शिवजयंती पाश्वभूमीवर खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी खालापूर तालुक्यातील पोलीस पाटील यांची 15 मार्च रोजी बैठक घेत नियम व अटी सांगून जर कोणीही या उत्सव काळात शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात येईल, त्यामुळे सर्वानी शासनाच्या नियमाचे पालन करून कोरोना रोखण्यात यश मिळावे, असे मत निरीक्षक विभूते यांनी व्यक्त केले.
पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले
हेही वाचा - आरोग्य, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांपेक्षा लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद
खालापूर तालुक्यात सर्व धर्माचे नागरिक राहत असून सर्व जण एकमेकांच्या सण - उत्सवात सहभाग घेत अनेक उत्सवाचा आनंद लुटत असून गेल्या वर्षभरापासून कोरोना महाभयंकर विषाणूने विळखा घातल्याने अनेकांना सण - उत्सवाचा मोठ्या प्रमाणात आनंद घेता आला नाही. मध्यतंरी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सर्वाना यश मिळाल्याने अनेक सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक नियमावली लावली असल्याने खालापूर तालुक्यातील प्रशासनाने कडक भूमिका घेत आगामी दिवसात साजरे होणारे सण - उत्सवावर नियम लावले असल्याने खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी 15 फेब्रुवारी रोजी खालापूर तालुक्यातील पोलिस पाटीलांची बैठक घेऊन कशा प्रकारे होळी - धुळवड - शिवजयंती उत्सव नागरिकांनी साजरी करावे यांचे मार्गदर्शन केले असून यावेळी पोलिस पाटील यांचे मत जाणून घेत त्याच्या समस्यांचे निराकारण केले.
शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार
तर पुढे बोलताना पोलिस निरिक्षक विभूते म्हणाले की, उत्सव साजरा करताना प्रत्येक प्रत्येकाची काळजी घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यावर भर दया. आतापर्यत कोरोनाची मोठी लढाई आपण मोठ्या चोखमीने पार पाडली तशीच लढाई पुढील काळात पाडून कोरोनावर यशस्वीरित्या मात करुया जेणेकरुन कोरोनाचा नायनाट करु. जर कोणी शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच पोलिस पाटील यांनी गावात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती आम्हाला वेळोवेळी देत रहा असे मत विभुते यांनी व्यक्त करित सर्वानी आगामी दिवसात साजरे होणारे सण - उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.
या बैठकीच्या वेळी सर्व धार्मिक उत्सव गुण्यागोविंदाने अत्यंत संयमाने सगळे सण साजरे करावे असा एकच सूर सर्वांचे तोंडुन निघाला. तर याप्रसंगी पोलिस निरिक्षक अनिल विभूते, पोलिस अधिकारी संजय बांगर, अंबिका अंधारे, गायत्री जाधव यांच्या मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते.
हेही वाचा - ...तर संघर्ष अटळ! वीज बिलाच्या मुद्द्यावरून उदयनराजेंचा इशारा