ETV Bharat / state

खालापुरातील दोन महामार्गांवर वाहने उलटली; कुठलीही जीवितहानी नाही - Car overturned on Mumbai-Pune highway

खालापूर तालुक्यात अपघाताची मालिका थांबता थांबेना झाली आहे. दररोज असंख्य अपघात होताना दिसत आहे. आज खालापुरातील दोन महामार्गांवर अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर ट्रक उलटला, तर खोपोली - पेण मार्गावर कार उलटल्याची घटना घडली आहे.

Khalapur highway vehicles overturned
खालापूर महामार्ग वाहने उलटली
author img

By

Published : Apr 4, 2021, 4:43 PM IST

Updated : Apr 5, 2021, 10:56 PM IST

रायगड - खालापूर तालुक्यात अपघाताची मालिका थांबता थांबेना झाली आहे. दररोज असंख्य अपघात होताना दिसत आहे. आज खालापुरातील दोन महामार्गांवर अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर ट्रक उलटला, तर खोपोली - पेण मार्गावर कार उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - माणकीवली ग्रामस्थांनी खडी मशीनवरील ओव्हरलोड वाहतूक अडवली

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

खालापूर तालुक्यातील मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल बागेश्री जवळ खोपोलीकडून पनवेलच्या दिशेने जाणारा एमएच. 46 एएफ. 2500 क्रमांकाचा ट्रक उलटला, तर खोपोली - पेण मार्गावर खोपोलीकडून - पेणच्या दिशेने जाणारी एमएच. 12 केव्हाय. 756 क्रमांकाची कार सकाळी दहाच्या सुमारास उलटली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघात झालेल्या वाहनांमुळे दोन्ही महामार्गांवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अनेक वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला असून अपघातग्रस्त वाहन चालकांना परिसरातील नागरिकांनी मदत करून वाहनांमधून सुखरूप बाहेर काढले.

हेही वाचा - उरणमध्ये तीन दिवसांत 23 जणांना श्वानांनी घेतला चावा

Last Updated : Apr 5, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.