ETV Bharat / state

पेण मतदारसंघातील रस्ते होणार चकाचक; केंद्राकडून 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर

author img

By

Published : Apr 30, 2021, 11:00 AM IST

Breaking News

रायगड - पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केलेल्या मागणीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण मतदारसंघासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून पेण तालुक्यातील वाशी, वढाव, काळेश्री तसेच सुधागड तालुक्यातील कुंभारशेत, हातोंड, गोंदव, महागाव, चंदरगाव या रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रविशेठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पेण मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी मागील महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्या अनुषंगाने नितीन गडकरी यांनी पेण मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत पेण तालुक्यातील वाशी -वढाव -काळेश्री या साडेपाच किमी रस्त्यासाठी 4 कोटी 86 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्याच प्रमाणे सुधागड तालुक्यातील दुर्गम अशा कुंभारशेत, हातोंड, गोंदव , महागाव , चंदरगाव या रस्त्यासाठी 6 कोटी 76 लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी दिली. आजच्या या कोरोनाच्या काळात देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण मतदारसंघासाठी रस्ते निर्मितीसाठी जो निधी उपलब्ध केल्याबद्दल रविशेठ पाटील यांनी गडकरी यांचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.