रायगड - महाड औद्योगिक क्षेत्रातील सेंडोज कंपनीसमोरील शेतात काम करणाऱ्या दोघांवर विद्युत तार पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. संकेत चंद्रकांत तांबे आणि महादेव गणपत पवार (रा. बिरवाडी वेरखोले) अशी मृतांची नावे आहेत.
संकेत तांबे व महादेव पवार हे सकाळी संडोज कंपनीसमोरील शेतात गवत कापण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेताच्या वरून महावितरण कंपनीची 22 केवी व्हॅटची तार गेली होती. महावितरण विभागाची ही तार तुटून संकेत व महादेव यांच्या अंगावर पडली. यामुळे संकेत व महादेव जागीच ठार झाले.
हेही वाचा - पनवेलकर का फिरवता आहेत मतदानाकडे पाठ?
अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज काळीजकर, दक्षिण रायगड व सेना अधिकारी विकास गोगावले यांच्यासह महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी दाखल झाले आहेत. बिरवाडीचे उपविभाग प्रमुख शिवाजी तांबे यांनी याप्रकरणी वीज वितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - 'पांढरे कपडे घालून जिल्हाधिकाऱ्यांना मारणारे खरे गुन्हेगार'