ETV Bharat / state

तुळशीखिंडीत रस्ता खचला, कशेडी घाटाकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद

या मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून दरड, झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहे.

तुळशीखिंडीत रस्ता खचला
author img

By

Published : Sep 6, 2019, 2:00 AM IST

रायगड - तुळशीखिंड रस्त्याला फाळकेवाडी येथे भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. रस्ता खचल्याने कशेडी घाटाला पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नातूनगर विन्हेरेमार्गे महाडकडे जाणारा हा रस्ता आहे. रस्ता वाहून गेल्याने कोकणातून परतणाऱ्या गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे.

तुळशीखिंडीत रस्ता खचला

हेही वाचा - कोट्यवधी रुपये पाण्यात..! नुतनीकरण केलेला मुंब्रा बायपास उखडल्याने प्रवाशांमध्ये रोष

या मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून दरड, झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहे.

हेही वाचा - हेल्मेट घातले नाही म्हणून कारचालकाला दंड!

कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तुळशीखिंड मार्ग हा कोकणात जाण्यासाठी आणि मुंबईकडे येण्यासाठी सोयीस्कर पडतो. मात्र, आता या रस्त्यालाच भगदाड पडल्याने गणेश विसर्जन करून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.

Intro:महाड तुळशीखिंडीत रस्ता खचल्याने पडले भगदाड

कशेडी घाटासाठी पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्याचा होत आहे वापर

रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद

रायगड : नातूनगर विन्हेरेमार्गे महाडकडे जाणारा तुळशीखिंड रस्त्याला फाळकेवाडी येथे भगदाड पडून रस्ताच खचून गेल्याने कशेडी घाटाला पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. रस्ता वाहून गेला असल्याने कोकणातुन परतणाऱ्या गणेश भक्तांचे प्रचंड हाल होणार आहेत. सदरची घटना ही आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या मार्गाचा वापर करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Body:तीन दिवसापासून पावसाने जिल्ह्यात बस्तान बांधले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून दरड, झाडे कोसळत आहेत. महाडजवळ तुळशीखिंड येथे रस्ता मुसळधार पावसाने खचून गेल्याने मोठे भगदाड रस्त्याच्या मधोमध पडले आहे.Conclusion:मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाल्यास वा कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तुळशीखिंड मार्ग हा कोकणात जाण्यासाठी व मुंबईत येण्यासाठी सोयीस्कर पडतो. मात्र आता या रस्त्यालाच भगदाड पडले असल्याने गणेश विसर्जन करून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्याचे रस्ता बंद झाल्याने हाल होणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.