ETV Bharat / state

ट्रक पलटी होऊन भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - truck-tempo accident raigad two died

पुण्याहुन मुंबईकडे जुन्या महामार्गाने ट्रक जात असताना तो खोपोली शिळफाट्याजवळ आला. यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील उभ्या असलेल्या टेम्पो आणि टपरीला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी झाला.

truck-tempo accident, 2 died in raigad
ट्रक पलटी होऊन भीषण अपघात
author img

By

Published : Aug 10, 2021, 12:40 PM IST

रायगड - पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने शिळफाट्यावर समोरील उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने देऊन ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील एकाचा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

पुण्याहुन मुंबईकडे जुन्या महामार्गाने ट्रक जात असताना तो खोपोली शिळफाट्याजवळ आला. यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील उभ्या असलेल्या टेम्पो आणि टपरीला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी झाला.

अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर -

या अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचुर झाला आहे. तर चालक केबिन खाली अडकला होता. या अपघाताची खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रक खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात मदत केली. मात्र, यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - सिल्लोडमध्ये भरधाव स्कॉर्पिओ उलटली; एक ठार, दोन जण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.