ETV Bharat / state

कारगिल विजय दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी 'उरी - दि सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाचा मोफत शो

कारगिल विजय दिनानिमित्ताने आज कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी गावातील सुपुत्र निलेश तुणतुणे यांना अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार व तहसीलदार सचिन शेजाळ यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच यावेळी राज्य सरकारतर्फे विद्यार्थ्यांना 'उरी - दि सर्जिकल स्ट्राईक' हा युद्धपट मोफत दाखविण्यात आला.

सहाणगोठी गावातील सुपुत्र निलेश तुणतुणे यांना श्रद्धांजली
author img

By

Published : Jul 26, 2019, 9:49 PM IST

रायगड - आज देशभरात 'कारगिल विजय दिन' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आज कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी गावातील सुपुत्र निलेश तुणतुणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच राज्य सरकारतर्फे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 'उरी - दि सर्जिकल स्ट्राईक' हा युद्धपट मोफत दाखविण्यात आला.

कारगिल विजय दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाचा मोफत शो

अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी गावातील सुपुत्र निलेश तुणतुणे हे सैन्यात गन मास्टर या पदावर रुजू होते. तर १९९८ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरू झाले होते. त्यामुळे ते बारामुल्ला, श्रीनगर, काश्मीर परिसरात युद्धात सहभागी झाले. यावेळी पाकिस्तानच्या सैन्याच्या हल्ल्यात १ ऑगस्ट १९९८ रोजी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या स्मरणार्थ सहाणगोठी या मूळ गावी हुतात्मा निलेश तुणतुणे यांचे स्मारक बांधण्यात आले.

तर आज कारगिल विजय दिनाच्यानिमित्त सहाणगोठी येथे हुतात्मा निलेश तुणतुणे यांच्या स्मृतीस अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार व तहसीलदार सचिन शेजाळ यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच यानिमित्ताने हुतात्मा निलेश तुणतुणे यांची आई निर्मला तुणतुणे, वडील नारायण तुणतुणे व कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

कारगिल विजय दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अनुभवला युद्धपटाचा थरार

युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना व अभिमान वृद्धींगत व्हावा, यासाठी आज राज्य सरकारतर्फे १८ ते २५ वयोगटातील युवकांना 'उरी - दि सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा दाखविण्यात आला. राजगड जिल्ह्यातील १० सिनेमागृहात २ हजार ९३८ तरुणांना हा सिनेमा दाखविण्यात आला. तर अलिबागमधील महेश टॉकीजमध्ये शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सिनेमा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

Intro:कारगिल विजय दिनानिमित्त शहीद निलेश तुणतुणे याना वाहिली श्रद्धांजली

कारगिल विजयी दिनानिमित्त द सर्जिकल स्ट्राईक सिनेमाचा मोफत शो

शहीद निलेश तुणतुणे यांच्या आईवडिलांचा केला सत्कार

युद्धपट सिनेमा पाहण्यास तरुणांची गर्दी

रायगड : कारगिल विजय दिवस म्हणून आज देशभरात साजरा होत आहे. कारगिलच्या भारत पाकिस्तान युद्धात अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी गावातील सुपुत्र निलेश तुणतुणे याला बारामुल्ला श्रीनगर काश्मीर येथे वीरमरण प्राप्त झाले. कारगिल विजय दिनाच्यानिमित्त सहाणगोठी येथे शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतीस आज अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार व तहसीलदार सचिन शेजाळ यांनी श्रद्धांजली वाहिली. तर कारगिल विजयी दिनाच्या निमित्ताने आज अलिबागमधील महेश टॉकीजमध्ये शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे उरी द सर्जिकल स्ट्राईक हा युद्धपट दाखविण्यात आला. यावेळी शहीद निलेश तुणतुणे याच्या आई, वडील व कुटुंबाचा सत्कार प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला.

Body:अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी गावातील निलेश तुणतुणे हा सैन्यात गन मास्टर या पदावर रुजू होता. भारत पाकिस्तान यांच्यात 1998 मध्ये कारगिल युद्ध सुरू झाले होते. यावेळी निलेश तुणतुणे हा बारामुल्ला, श्रीनगर, काश्मीर परिसरात युद्धात सहभागी झाले होते. यावेळी दुश्मन पाकिस्तानच्या सैन्याच्या हल्ल्यात 1 ऑगस्ट 1998 रोजी निलेश तुणतुणे याला वीरमरण प्राप्त झाले.

सहाणगोठी या मूळ गावी शहीद निलेश तुणतुणे यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. आज कारगिल विजयी दिनाच्या निमित्ताने शहीद निलेश तुणतुणे याला शासनातर्फे श्रद्धांजली वाहून अभिवादन केले. यावेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, निलेश तुणतुणे यांची आई निर्मला तुणतुणे, वडील नारायण तुणतुणे, भाऊ शैलेश तुणतुणे, ग्रामस्थ उपस्थित होते.

Conclusion:कारगिल विजय दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अनुभवला युद्धपटाचा थरार

26 जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना व अभिमान वृद्धीगत व्हावा यासाठी राज्य शासनाकडून सिनेमागृहात उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा 18 ते 25 वयोगटातील युवकांना दाखविण्यात आला.

जिल्ह्यातील 10 सिनेमागृहात 2 हजार 938 तरुणांना हा सिनेमा दाखविण्यात आला. अलिबाग मधील महेश टॉकीजमध्ये शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली होती. सिनेमा सुरू होण्याआधी शहीद निलेश तुणतुणे यांच्या आई वडिलांचा सत्कारही यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.