ETV Bharat / state

रायगडमध्ये आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा - raigad

शासनाच्या वन हक्क कायद्यातील बदलाला विरोध म्हणून शेकडो आदिवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कायद्यात झालेल्या बदलामुळे जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजावर जंगल सोडण्याची वेळ येईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
author img

By

Published : Jul 22, 2019, 5:00 PM IST

रायगड - शासनाच्या वन हक्क कायद्यातील बदलाला विरोध म्हणून शेकडो आदिवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कायद्यात झालेल्या बदलामुळे जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजावर जंगल सोडण्याची वेळ येईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येण्याआधी हिराकोट तलावाजवळ पोलिसांनी अडवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा अडविल्यानंतर मोर्च्यात सहभागी काही प्रतिनिधींनी भाषणे केली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

आदिवासी, कातकरी समाजाच्या पिढ्यानपिढ्या ह्या जंगलातच वास्तव्यात गेल्या आहेत. मात्र, नवीन कायद्यानुसार वन अधिकाऱ्यांना विषेश अधिकार दिल्याने जंगलातील वनसंपत्तीबाबत आदिवासी बांधवावर बंधने आली आहेत. जंगलातील लाकडे नेण्यासही बंदी असून त्यासाठी 50 ते 45 लाखाचा दंड आकारला जाणार आहे. वन हक्क कायद्यात नव्याने झालेल्या बदलांमुळे आदिवासी व कातकरी समाजाला जाचक अटींना सामोरे जावे लागत आहे. जंगलाच्या राजाला देशोधडीला लावून खाजगी उद्योगपतींना जंगल राखण्यास देण्याकडे शासनाची पावले वळत आहेत त्यामुळे, शासनाने आदिवासींच्या या समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

Intro:आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

रायगड : शासनाच्या वन हक्क कायद्यातील बदलामुळे जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजावर जंगल सोडण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे आदिवासी समाज हा देशोधडीला लागणार असल्याने शासनाच्या विरोधात शेकडो आदिवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चेकरच्या शिष्टमंडळानी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले.

Body:शासनाने वन हक्क कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे वनांमध्ये पूर्वपार राहत असलेल्या आदिवासी, कातकरी समाजावर जंगल सोडण्याची वेळ आली आहे. तसेच आदिवासी, कातकरी समाजाच्या पिढ्यानपिढ्या ह्या जंगलातच वास्तव्यात गेल्या आहेत. मात्र नवीन कायद्यानुसार वन अधिकाऱ्यांना अधिकार दिल्याने जंगलातील वनसंपत्तीबाबत आदिवासी बांधवावर बंधन आली आहेत. जंगलातील लाकडे नेण्यासही बंदी असून त्यासाठी 50 ते 45 लाखाचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे या वन हक्क कायद्यामुळे जाचक अटीना आदिवासी व कातकरी समाजाला सामोरे जावे लागत आहे.

Conclusion:एकीकडे जंगलाच्या राजाला देशोधडीला लावून खाजगी उद्योगपतींना जंगल राखण्यास देण्याबाबत पावले शासनामार्फत केली जात आहेत. वन हक्क कायद्यामुळे आज वनातील वनवासी हा बेदखल होणार आहे. या विरोधात आदिवासी बांधवांनी एकत्रित येऊन शासनाविरोधात धडक मोर्चा काढला. त्यामुळे शासनाने आदिवासी बांधवांच्या या समस्येबाबत लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे.

अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येण्याआधी हिराकोट तलावाजवळ पोलिसांनी अडविला. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आदिवासी बांधवांचा मोर्चा निघाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा अडविल्यानंतर नेते मंडळींची भाषणे झाली. त्यानंतर शिष्टमंडळानि जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.