ETV Bharat / state

पनवेल रेल्वे स्टेशनवर छत बसवण्यासाठी झाडांवर कुऱ्हाड

जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक वाढल्याने पनवेल रेल्वे स्टेशनचे महत्व आणखी वाढणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून भारताच्या दक्षिणेला जाणाऱ्या एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात जातात. उत्तरेला जाणाऱ्या रेल्वेही पनवेलवरून जातात.

tree-cut-down-for-cover-roof-on-the-platform-at-panvel-station
पनवेल स्टेशन
author img

By

Published : Dec 21, 2019, 10:47 PM IST

रायगड- येथील पनवेल रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या विस्थाराचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यामध्ये सर्वप्रथम नव्याने अस्तित्वात असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहा आणि सातची लांबी आणि त्यावर छत बसवण्याची कामे सुरू आहेत. मात्र, पनवेल रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर छत बसवण्याच्या कामात आड येणाऱ्या झाडांची तोड करण्यात येत आहे.

पनवेल स्टेशन

हेही वाचा- दिशा प्रकरण: गोळीबारात ठार झालेल्या चार आरोपींचे शवविच्छेदन पुन्हा करा, तेलंगाणा उच्च न्यायालय

जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक वाढल्याने पनवेल रेल्वे स्टेशनचे महत्व आणखी वाढणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून भारताच्या दक्षिणेला जाणाऱ्या एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात जातात. उत्तरेला जाणाऱ्या रेल्वेही पनवेलवरून जातात. त्या अनुषंगाने पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या ही सात पर्यंत नेण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक सहा आणि सातवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. परंतु, या दोन्ही प्लॅटफॉर्मवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात कडक उन्हात आणि पावसात भिजत उभे राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे या दोन्ही प्लॅटफॉर्मवर छत बसवण्याची कामे पनवेल रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरू केली आहेत.

प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर अनेक वर्षांपासून एक झाड होते. या प्लॅटफॉर्मवर बसवण्यात येणाऱ्या छताच्या उंचीपेक्षाही जास्त उंचीपर्यंत हे झाड उंचावले होते. या झाडामुळे प्लॅटफॉर्मवर छत बसवण्यात अडचणी येत होत्या. म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी हे झाडच कापण्याचा जावईशोध घेतला आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर छत नसताना या झाडाच्या सावलीत उभे राहून गाड्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांना आता प्लॅटफॉर्म क्रमांक 6 अगदी भकास वाटू लागले आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वर छत बसवायचे म्हणून झाड तोडले. मात्र, छताचे काम कधी होणार माहित नाही. त्यामुळे आता प्रवाशांना उन्हात उभे राहून गाड्यांची वाट पहावी लागणार, अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. एकीकडे शासन वृक्षलागवड व संवर्धनासाठी जनजागृती करुन झाडांची संख्या वाढण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या उदासिनतेमुळे नव्याने वृक्ष लागवड करणे होत नाही मात्र, जुन्या वृक्षांचे देखील संवर्धन केले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

Intro:सोबत व्हिडीओ जोडले आहेत

पनवेल

पनवेल रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या विस्थारीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यामध्ये सर्व प्रथम नव्याने अस्तित्वात असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहा आणि सात ची लांबी आणि त्यावर छत बसवण्याची कामे सुरू आहेत. पनवेल रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर छत बसवण्याच्या कामात आड येणाऱ्या झाडांची तोड करण्यात येत आहे.
Body:जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक वाढल्याने पनवेल रेल्वे स्टेशनचं महत्व आणखी वाढणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून भारताच्या दक्षिणेला जाणाऱ्या एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात जातात. उत्तरेला जाणाऱ्या रेल्वेही पनवेलवरून जातात.
त्या अनुषंगाने पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या ही सात पर्यंत नेण्यात आलीये. प्लॅटफॉर्म क्रमांक सहा आणि सात वर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. परंतु या दोन्ही प्लॅटफॉर्मवर छत नसल्यानं प्रवाशांना उन्हाळ्यात कडक उन्हात आणि पावसात भिजत उभं राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे या दोन्ही प्लॅटफॉर्मवर छत बसवण्याची कामे पनवेल रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरू केली आहेत. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर अनेक वर्षांपासून एक झाड होत. या प्लॅटफॉर्मवर बसवण्यात येणाऱ्या छताच्या उंचीपेक्षाही जास्त उंचीपर्यंत हे झाड उंचावलं होत. या झाडामुळे प्लॅटफॉर्मवर छत बसवण्यात अडचणी येत होत्या. म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी थेट हे झाडच कापण्याचा जावईशोध घेतला आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर छत नसताना या झाडाच्या सावलीत उभं राहून गाड्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांना आता प्लॅटफॉर्म क्रमांक 6 अगदी भकास वाटू लागलं आहे. तसंच प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वर छत बसवायचे म्हणून झाड तोडले, पण ते छत बसवून कधी होईल ते होईल पण तोपर्यंत आता उन्हात उभं राहून गाड्यांची वाट पहावी लागणार, अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करतात.Conclusion:एकीकडे शासन वृक्षलागवड व संवर्धनासाठी जनजागृती करुन झाडांची संख्या वाढण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या उदासिनतेमुळे नव्याने वृक्ष लागवड करणे तर सोडाच मात्र आहे त्या वृक्षांचे देखील संवर्धन केले जात नसल्याचं चित्र दिसुन यात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.