ETV Bharat / state

मानसरोवर बस थांबा प्रवाशांसाठी झालाय डोकेदुखी - Panvel

मानसरोवर बस स्थानकात भौतिक सुविधा नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

problem
author img

By

Published : Feb 5, 2019, 2:24 PM IST

पनवेल - मानसरोवर रेल्वे स्टेशन समोरच्या बस स्थानकात भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे बसस्थानक प्रवाशांसाठी डोकेदुखी झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पनवेलच्या कामोठे आणि कळंबोली वसाहतीमधील नागरिकांसाठी मानसरोवर रेल्वे स्टेशन समोर एनएनएमटीचा बस थांबा उभारण्यात आला आहे. पण हा बस थांबा प्रवाशांसोबत एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील गैरसोयीचा ठरतोय. या ठिकाणी बस फेर्‍यांचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपाची निवारा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात सगळीकडे केर-कचरा साचलेला असल्यामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.

एनएनएमटी वाहतूक विभागात प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते. मात्र, हा पैसा जातो कुठे? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून होत आहे. या परिसरातील कचऱ्यामुळे होणाऱ्या डासांपासून बचाव करण्यासाठी एनएमएमटीच्या कर्मचारी अक्षरशः कचरा जाळून स्वतःचा बचाव करत आहेत. मानसरोवर स्थानकात कर्मचाऱ्यांना शौचालयासाठी कोणतीही व्यवस्था नाही.
या स्थानकावर असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत. पण संबंधित प्रशासकीय यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केली.

undefined

Intro:पनवेल

सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या मानसरोवर रेल्वे स्टेशन समोरचे बस स्थानक म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा असेच म्हणावे लागेल. कारण या बस स्थानकात कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत इथे मानसरोवर बस थांबा म्हणून पार्टी जरी लावली असली तरी इथे येणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी साधी आसन व्यवस्था देखील नाही या बस स्थानकात होणाऱ्या कचऱ्यामुळे डासांपासून वाचण्यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांवर कचरा जाळून बचाव करण्याची वेळ आली आहे.

Body:पनवेलच्या कामोठे आणि कळंबोली वसाहतीमधील नागरिकांसाठी मानसरोवर रेल्वे स्टेशन बाहेर एनएनएमटीचा बस थांबा बनवण्यात आला आहे. पण हा बस थांबा प्रवाशांसोबत एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील गैरसोयीचा ठरतोय. या ठिकाणी बस फेर्‍यांचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा व्यवस्था करण्यात आला आहे. त्यात लाकडापासून तयार केलेल्या असं व्यवस्थेवरच कर्मचाऱ्यांना दिवसभर काम करावे लागते. प्रत्यक्षात या परिसरात सगळीकडे केर कचरा पडलेला असतो गोदामात सारखी स्थिती असताना इथे प्रवासी बसतात तरी कसे? हे त्यांचे त्यांनाच ठाऊक याबाबत एका कर्मचाऱ्याला विचारपूस केली असता त्याने सर्व समस्यांचा उलगडा केला. घाणेरी निवारा व्यवस्था संपूर्ण कचरा पंखा बरोबर नाही प्रवाशांना बसण्याची कुठलीच सोय नाही आईन हिवाळ्यात थंडीमध्ये कुडकुडत प्रवाशांची सेवा करणाऱ्या इथल्या एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीची सोय नाही त्यामुळे काम करण्याची त्यांची मानसिकता कशी काय तयार होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एन एन एम टी वाहतूक विभागात प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते हा पैसा जातो कुठे मूर्त कुठे काही पत्ताच नाही कर्मचारी सोयीसुविधांपासून वंचित आहेत वाहक बाहेर जाऊन भोजन करतात महिला वाहक कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो या बस स्थानकात जिकडेतिकडे घाण पसरली आहे सफाईचा अभाव दिसून येतो. शिवाय या परिसरातील कचऱ्यामुळे होणाऱ्या डासां पासून बचाव करण्यासाठी इथल्या एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांवर अक्षरशः कचरा जाळून स्वतःचा बचाव करण्याची वेळ आली आहे.

Conclusion:मानसरोवर बस स्थानक म्हणजे जणू काही सरकारी कोंडवाडा आहे की काय? अशी शंका इथले प्रवासी विचारतात. मानसरोवर स्थानकात कर्मचाऱ्यांना शौचालयासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक शौचालय किंवा स्थानिक परिसरात उभारलेल्या सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये या कर्मचाऱ्यांना मुतारीची व्यवस्था करण्यात येत असल्याने मोठी कुचंबणा सहन करावी लागत आहे. या स्थानकावर असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत. पण संबंधित प्रशासकीय यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास होत असल्याची प्रतिक्रिया एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केली आहे.

-------
बातमीसाठी व्हिडिओ एफ टी पी करीत आहे. याच slug ने
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.