ETV Bharat / state

खड्डेमय रस्ते, अपघातामुळे चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत - वाहतुक कोंडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी गावी निघाले असून या चाकरमान्यांना सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

झालेली वाहतूक कोंडी
author img

By

Published : Sep 1, 2019, 12:36 PM IST

रायगड - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी गावी निघाले असून या चाकरमान्यांना सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. खड्डेमय रस्त्याचा सामना करत मार्गस्थ झालेल्या कोकणकरांना वडपाले येथे झालेल्या अपघातामुळे आणखी उशीर लागणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते वडखळ, इंदापूर, माणगाव, लोणारे या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे या महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

उद्या 2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने दोन दिवसांपासून कोकणात जाणारे चाकरमानी गावी निघाले आहेत. त्यात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याने व एसटी बसचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमानी स्वतःच्या वा भाड्याच्या वाहनांनी गावी निघाले आहेत. मात्र, मुंबई-गोवा महामार्गही मोकळा नसल्याने चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्याने डुलतडुलत संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे वाहतूक कोंडीने हाल झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर पेण तरणखोप ते वडखळ दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून तसेच खड्डे पडलेले असल्याने या मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना हा रस्ता पार करण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे. इंदापूर, माणगाव या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झालेली आहे. माणगाव वडपाले येथे सकाळी एसटी बसला आग लागल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

खड्डेमय रस्ता, अपघात, महामार्गाच्या रुंदीकारणचे काम यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या या दुरावस्थेमुळे प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांकडून नाराजीही व्यक्त होत आहे.

Intro:मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

खड्डेमय रस्ता, महामार्गाचे काम व अपघातामुळे चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत

रायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी गावी निघाले असून या चाकरमान्यांना सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी, माणगाव वडपाले जवळ अपघात तसेच खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पेण ते वडखळ, इंदापूर, माणगाव, लोणारे या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर या महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.Body:उद्या 2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने दोन दिवसांपासून कोकणात जाणारे चाकरमानी गावी निघाले आहेत. त्यात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्याचे वेळा पत्रक कोलमडले असल्याने व एसटी बसचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमानी स्वतःच्या वा भाड्याच्या वाहनांने गावी निघाले आहेत. मात्र मुंबई गोवा महामार्गही मोकळा नसल्याने चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्याने डुलतडुलत संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे चाकरमान्याचे वाहतूक कोंडीने हाल झाले आहेत.
Conclusion:मुंबई गोवा महामार्गावर पेण तरणखोप ते वडखळ दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून तसेच खड्डे पडलेले असल्याने या मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना हा रस्ता पार करण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे. इंदापूर, माणगाव या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झालेली आहे. माणगाव वडपाले येथे सकाळी एसटी बसला आग लागल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

खड्डेमय रस्ता, अपघात, महामार्गाच्या रुंदीकारणचे काम यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या या दुरावस्थेमुळे प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांकडून नाराजीही व्यक्त होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.