ETV Bharat / state

माथेरानमध्ये घोडे चालकांकडून होणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीवर मनसेचा आक्रमक पवित्रा - raigad

माथेरानमधील पर्यटनस्थळे दाखवण्यासाठी घोडेचालक पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारला जात असून त्यांची दिशाभूल केली जात आहे. त्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

matheran
matheran
author img

By

Published : Mar 19, 2021, 5:41 PM IST

Updated : Mar 19, 2021, 6:00 PM IST

खालापूर - थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये शहराबाहेरील घोडेचालक घोडेस्वारीसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. त्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मनसेने घेतला आक्रमक पवित्रा

माथेरानचे स्थानिक प्रशासन हा प्रकार थांबविण्यासाठी कोणतीच कारवाई किंवा उपाययोजना देखील करत नसून फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. माथेरान मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेने जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले आहे.

mns
mns

खोटी प्रेक्षणीय स्थळे दाखवत पर्यटकांकडून जास्त पैसे उकळले जातात
या निवेदनात माथेरान नगरपरिषद हद्दीत असलेल्या ३८ प्रेक्षणीय स्थळांशिवाय पर्यटकांना वारंवार खोटी प्रेक्षणीय स्थळे दाखवली जातात. तसेच पर्यटकांकडून कमी वेळात जास्त पैसे उकळले जात आहेत. माथेरान पर्यटनाबद्दल चुकीची माहिती देऊन तीन दिवसांचे पर्यटन अवघ्या एक दिवसावर आणून ठेवले आहे. त्यामुळे घोडे आणि रिक्षा चालक पर्यटकांना नकाशावरील प्रेक्षणीय स्थळांकडे घेऊन जात नसल्याने अनेक प्रेक्षणीय स्थळे बंद पडली आहेत.

mns
निवेदन देताना मनसे कार्यकर्ते

हेही वाचा - पाच फोन कॉल, हिरेन- वाझे भेट अन दहा मिनिटांची चर्चा; एनआयएच्या हाती महत्वाचा पुरावा

स्थानिक पर्यटनावर गदा

यामुळे स्थानिक रोजगारावर गदा आल्याने येथील स्थानिक व्यवसायिक मेटाकुटीला आल्याचेही निवदेनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात माथेरान अधीक्षक बापुसाहेब भोई, माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच रायगड पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन दिले असल्याचे माथेरान मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांनी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष संतोष केळगणे, उपाध्यक्ष असिफ खान, सचिव रविंद्र कदम तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - चीनच्या विस्तारवादी धोरणाविरोधात 'क्वाड'

Last Updated : Mar 19, 2021, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.