ETV Bharat / state

रायगड : कर्जत-खालापूरमधील धरण, धबधबे परिसरात जाण्यास बंदी

धबधबा, धरण व तलाव या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता हे प्रतिबंधात्मक (कलम 144) आदेश प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी जारी केले आहेत. हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असतील.

रायगड : कर्जत-खालापूरमधील धरण, धबधबे परिसरात जाण्यास बंदी
रायगड : कर्जत-खालापूरमधील धरण, धबधबे परिसरात जाण्यास बंदी
author img

By

Published : Jun 10, 2021, 3:40 PM IST

खालापूर (रायगड) - पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक हे धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येत असून जीवितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच यावर्षी धबधबा, धरण व तलाव या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता हे प्रतिबंधात्मक (कलम 144) आदेश प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी जारी केले आहेत. हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असतील. त्यामुळे मौजमज्जा करण्यासाठी पाण्याच्या प्रवाहात उतर मनाई करण्यात आली आहे.

कर्जत उपविभागात येणाऱ्या कर्जत आणि खालापूरमधील एकूण 23 ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी काढले आदेश

कुठकुठली धरणे आणि धबधबे आणि तालुका खालीलप्रमाणे
कर्जत तालुका -
1) आषाणे कोषाणे धबधबा
2) सोलनपाडा धरण
3) पळसदरी धरण
4) कोंढाणे धरण/धबधबा
5) पाली भुतीवली धरण
6) नेरळ जुमापट्टी धबधबा
7) बेडीसगाव धबधबा
8) पाषाणे तलाव
9) बेकरे धबधबा
10) आनंदवाडी धबधबा
11) टपालवाडी धबधबा

खालापूर तालुका -
1) झेनिथ धबधबा
2)आडोशी धबधबा व परिसर
3) आडोशी तलाव
4) बोरगाव धबधबा
5) भिलवले धरण
6) मोरबे डॅम
7) नढाळ/वरोसे धरण
8) वावर्ले धरण
9) माडप धबधबा
10) धामणी धबधबा
11) कलोते धरण

कशावर आहे प्रतिबंध?
1.पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघडवावर मद्य सेवन करणे.

2.पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे.

3. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात खोलपाण्यात उत्तरण व त्यामध्ये पोहणे.

4.धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.

5. सायंकाळी ६.०० वाजलेनंतर ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत या कालावधीत धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे.

6. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे.

7.वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीवर परिणाम अडथळा होईल अशाप्रकारे वाहन चालविणे.

8. वाहनाची ने - आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.

9. सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघडयावर इतरत्र फेकणे.

10. सार्वजनिक ठिकाणी येण्याच्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

11. सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डि.जे.सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/वूफर वाजवणे व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे.

12. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे.

13. धबधब्याचे 1 किमी परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश. (अत्यावश्यक सेवा वगळून)

14. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असून सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.