ETV Bharat / state

महिलांनी केला रायगडावरील हिरकणी कडा सर - रायगड हिरकणी कडा लेटेस्ट न्यूज

सोमवारी जागतिक महिला दिन साजरा केला गेला. महिलांनी आपल्या हक्कांसाठी लढा देऊन आपले अधिकार मिळवल्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून काही गिर्यारोहक महिलांनी रायगडावरील हिरकणी कडा सर करून हिरकणीच्या पराक्रमाच्या आठवणी ताज्या केल्या.

Trekkers
गिर्यारोहक न्यूज
author img

By

Published : Mar 9, 2021, 9:34 AM IST

रायगड - आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन किल्ले रायगडावर महिलांनी हिरकणीच्या पराक्रमाच्या आठवणी ताज्या केल्या. आपल्या बाळासाठी किल्ले रायगडावरील कठीण बुरुज हिरकणीने उतरून आपले घर गाठले होते. हा हिरकणी बुरुज 'शिलेदार' संस्थेच्या महिलांनी सर करत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.

'शिलेदार' संस्थेच्या महिलांनी हिरकणी कडा सर केला

50 महिलांनी सर केला हिरकणी कडा -

हिरकणीच्या पराक्रमाला उजाळा देत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिलेदार संस्थेच्या महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून हिरकणी कडा सर केला. या उपक्रमानंतर या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या मोहिमेत सातारा पोलीस दलातील मोनाली निकम, सोलापूर वनविभागातील शिला बडे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पन्नास महिला सहभागी झाल्या होत्या. आदिती व आर्या या लहान मुलींनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला.

खडतर कडा उतरली होती 'हिरकणी' -

स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड अभेद्य होता. याठिकाणाहून 'फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो' असे वर्णन येथील कड्यांचे करण्यात आले होते. मात्र, घरी असलेल्या लहानग्या बाळासाठी हिरकणी नावाच्या सर्वसामान्य महिलेने कोणत्याही दोरीविना पराक्रमाची शर्थ करत गडाचा कडा उतरला होता. नंतर, या कड्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून 'हिरकणी' असे नाव दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.