रायगड - माथेरानच्या जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत स्थानिक रहिवाश्यांना रस्त्यावरून जात असताना दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार समोर आला, सदर मयत व्यक्ती झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून शरीर कुजलेल्या अवस्थेत दिसत आहे. नेरळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे कळलेले नाही.
माथेरानच्या जंगलात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या तपास सुरू - raigad latest crime news
काही दिवसांपूर्वी माथेरानला चालत निघालेली ही व्यक्ती नागरिकांना अडवून स्वतःच्या नोकरी साठी विचारपूस करत होती. तर भूक लागली म्हणून सांगत असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेबाबत अधिक तपास सुरू असून ही हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकले नाही.