रायगड - अलिबाग विधानसभा मतदारसंघात नाम साधर्म्य असलेल्या व्यक्तींनी उमेदवारी अर्ज भरण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार सुभाष (पंडित) प्रभाकर पाटील यांच्यासोबत सुभाष लक्ष्मण पाटील, सुभाष जनार्दन पाटील, सुभाष दामोदर पाटील, सुभाष गंगाराम पाटील या चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या नाम साधर्म्यचा फटका या सर्व उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. मतदारांचाही गोंधळ होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 27 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. शेकापचे सुभाष (पंडित) पाटील यांनी सोमवारी पहिला अर्ज दाखल केला. यानंतर सुभाष पाटील याच नावाने चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा - रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; आमदार सुरेश लाड यांचा निवडणूक लढवण्यास नकार
अलिबाग विधानसभा मतदारसंघात नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारांची पंचवीस वर्षांपासून परंपरा सुरू आहे. सुभाष पाटील (शेकाप) यांचे नाम साधर्म्य असलेल्या चार उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.