ETV Bharat / state

कुंडलिका नदीत बुडालेल्या तिसऱ्या पर्यटकाचा मृतदेह शोधण्यात यश

मुंबई येथील तीन तरुण रोहा तालुक्यातील बल्ले चिंचोली गावातील कुंडलिका नदी पात्रात बुडाल्याची घटना घडली होती. यानंतर सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत दोघांचे मृतदेह सापडले होते. तर तिसरा पर्यटक बेपत्‍ता होता. आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास राफटर्सच्‍या हाती त्याचा मृतदेह लागला आहे.

author img

By

Published : Jun 17, 2019, 6:33 PM IST

कुंडलिका नदीत बुडालेल्या तिसऱ्या पर्यटकाचा मृतदेह शोधण्यात यश

रायगड - मुंबई येथील तीन तरुण रोहा तालुक्यातील बल्ले चिंचोली गावातील कुंडलिका नदी पात्रात बुडाल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. यानंतर सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत दोघांचे मृतदेह सापडले होते. तर तिसरा पर्यटक बेपत्‍ता होता. आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास राफटर्सच्‍या हाती त्याचा मृतदेह लागला आहे.

महेश अरुण जेजुरकर (वय 39), परेश अरुण जेजुरकर (वय 35), अक्षय शालिग्राम गणगे (वय 29) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.

रोहा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संकेत पवार हे मुंबईहून आपल्या काही मित्रांसह गावी आले होते. त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संकेत पवार हे महेश जेजुरकर, परेश जेजुरकर, अक्षय गणगे यांच्यासह अन्य मित्रांबरोबर गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी पात्रात पोहण्यास गेले. त्यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने महेश, परेश व अक्षय हे तिघे बुडाले. त्यावेळी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सोबत आलेल्या मित्रांनी केला. मात्र, त्यांना अपयश आले.

पोलिसांनी राफटर्सच्‍या मदतीने रविवारी दुपारपासून शोधमोहीम हाती घेतली होती. रविवारी उशिरापर्यंत परेश व अक्षय या दोघांचे मृतदेह हाती लागले होते. मात्र महेशचा शोध लागत नव्हता. दरम्यान, संध्याकाळ झाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आल्यानंतर महेशचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

दुर्घटनेतील तिन्ही तरूण परीसरातील सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असत. त्‍यांच्‍या जाण्‍याने ट्रॉम्‍बे गावात हळहळ व्‍यक्‍त होत आहे. परेश व महेश जेजुरकर बंधू फुलांच्‍या सजावटीचा व्‍यवसाय करीत होते. तर अक्षय गणके हा आय टी कंपनीत कामाला होता.

Intro:कुंडलिका नदीत बुडालेल्या तिसऱ्या पर्यटकांचा मृतदेह शोधण्यात यश

रायगड : कोलाड जवळच्‍या बल्‍हे गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीत बुडून बेपत्‍ता झालेल्‍या तिसऱ्या पर्यटकांचा मृतदेह आज सकाळी पावणे अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास राफटर्सच्‍या हाती लागला. काल बुडालेल्‍या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सायंकाळी हाती लागले होते.

Body:रायगड जिल्‍हयातील कोलाड जवळ असलेल्‍या बल्‍हे गावात मुंबईच्‍या ट्रॉम्‍बे परीसरातील 28 तरूण सहलीसाठी आले होते. त्‍यातील काहीजण कुंडलिका नदीत पोहण्‍यासाठी उतरले. यापैकी तिघांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. स्‍थानिकांनी त्‍यांना  वाचवण्‍याचा असफल प्रयत्‍न केला.  महेश जेजुरकर, परेश जेजुरकर या दोघा सख्‍या भावांसह अक्षय गणगे याचा त्‍यात समावेश आहे. पोलीसांनी राफटर्सच्‍या मदतीने रविवारी दुपारपासून शोधमोहीम हाती घेतली. काल उशिरापर्यंत परेश व अक्षय या दोघांचे मृतदेह हाती लागले होते.Conclusion:काल काळोख झाल्‍यामुळे थांबवलेली शोधमोहीम आज सकाळी पुन्‍हा सुरू करण्‍यात आली. या मोहीमेत महेश जेजुरकर याचा मृतदेह  हाती लागला. दुर्घटनेतील दुर्देवी तरूण परीसरातील सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असत. त्‍यांच्‍या जाण्‍याने ट्रॉम्‍बे गावात हळहळ व्‍यक्‍त होत आहे. परेश व महेश जेजुरकर बंधू फुलांच्‍या सजावटीचा व्‍यवसाय करीत तर अक्षय आय टी कंपनीत कामाला होता. स्‍थानिक आमदार तुकाराम काते कालपासून बल्‍हे गावात ठाण मांडून सर्वतोपरी मदत करीत होते. कुंडलिका राफटर्सच्‍या टीमने मेहनत घेत मृतदेह शोधण्‍यात प्रमुख भूमिका बजावली त्‍यांना ग्रामस्‍थांची मोलाची मदत झाली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.