रायगड - रायगड किल्ल्यावर कमी वेळात जाण्यासाठी उपयुक्त असलेला रायगड रोपवे शनिवार 18 जानेवारीला दिवसभर बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीकरता रोपवे बंद असणार असल्याची माहिती, रायगड रोपवेचे अधिकारी राजेंद्र खातू यांनी दिली आहे.
हेही वाचा - रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध
किल्ल्यावर जाण्यासाठी दिड हजार पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे रायगडावर पायी जाणाऱ्या पर्यटकांची चांगलीच दमछाक होते. यावर उपाय म्हणून रायगड रोपवेची सोय करण्यात आली आहे. केवळ चार मिनिटात गडाच्या पायथ्यापासून पर्यटकांना गडावर नेणारा रोपवे एका दिवसासाठी बंद राहणार आहे.