ETV Bharat / state

रायगडात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - सतर्क

आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर हा कमी जास्त होत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

रायगडात मुसळधार
author img

By

Published : Sep 5, 2019, 1:14 PM IST

रायगड - ऐन गणेशोत्सवावेळी वरूणराजाने वक्रदृष्टी टाकली आहे. काल (बुधवार) जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर हा कमी जास्त होत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

रायगडात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

आज जिल्ह्यातील अलिबाग येथे १२५ मिमी, पेण १०५ मिमी, मुरुड ९४ मिमी, पनवेल १८८.०४, कर्जत १५१.०४ मिमी, उरण १०३ मिमी, खालापूर १०२ मिमी, माणगाव ११० मिमी, रोहा १५८ मिमी, सुधागड १३८ मिमी, तळा १४७ मिमी, महाड ५६ मिमी, पोलादपूर १४० मिमी, म्हसळा ९९ मिमी, श्रीवर्धन १०० मिमी, माथेरान २०३.०४ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी एकूण २०१९.१२ मिमी पाऊस पडला असून सरासरी १२६.२० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Intro:
जिल्ह्यात पावसाचे बरसो रे बरसो

पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रायगड : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने आपले बस्तान बांधले असून ऐन गणेशोस्तव सणाला वरुणराजाने वक्रदृष्टी टाकली आहे. आज पहाटे पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. जिल्ह्यातील नद्यांची इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत. पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. Body:4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पावसाने पूरस्थिती निर्माण केली होती. तर अनेक ठिकाणी दरड, झाडे कोसळून वाहतूक बंद झाली होती. दरड, झाडे काढल्यानंतर वाहतूक पूर्व पदावर आली आहे. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आली होती. आज 5 सप्टेंबर रोजी पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे ऐन गणेशोस्तव काळात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसाचा जोर हा कमी जास्त होत असला तरी जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना व नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. Conclusion:आजचा पडलेला पाऊस

अलिबाग 125 मिमी, पेण 105 मिमी, मुरुड 94 मिमी, पनवेल 188.04, कर्जत 151.04 मिमी, उरण 103 मिमी, खालापूर 102 मिमी, माणगाव 110 मिमी, रोहा 158 मिमी, सुधागड 138 मिमी, तळा 147 मिमी, महाड 56 मिमी, पोलादपूर 140 मिमी, म्हसळा 99 मिमी,श्रीवर्धन 100 मिमी, माथेरान 203.04 मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात 5 सप्टेंबर रोजी एकूण 2019.12 मिमी पाऊस पडला असून सरासरी 126..20 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.