ETV Bharat / state

गेट वे कडून मांडवाकडे येणारी प्रवासी बोट बुडाली; ८८ प्रवाशांचे वाचले प्राण - boat accident at raigad

गेटवे येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अजंठा बोट 88 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे निघाली होती. मांडवा बंदराजवळ बोट आली असता अचानक बोटीत बिघाड होऊन पाणी घुसू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू लागले.

raigad
गेट वे कडून मांडवाकडे येणारी प्रवासी बोट बुडाली; ८८ प्रवाशांचे वाचले प्राण
author img

By

Published : Mar 14, 2020, 12:04 PM IST

Updated : Mar 14, 2020, 12:42 PM IST

रायगड - गेट वे येथून अजंठा ही प्रवासी बोट 88 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे येत असताना बोटीत पाणी घुसून बोट बुडाली. मांडवा पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे या 88 प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत आणि सदगुरू कृपा बोटीतील दोन खलाशांनी बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले. त्यामुळे या बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचविणारे हे तिघे त्यांच्यासाठी देवदूत ठरले आहेत.

गेट वे कडून मांडवाकडे येणारी प्रवासी बोट बुडाली; ८८ प्रवाशांचे वाचले प्राण

हेही वाचा - गतीमंद मुलीवर अत्‍याचार: प्रकरण दाबण्याचा प्रयत्न.. भाजपने काढला मोर्चा

गेटवे येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अजंठा बोट 88 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे निघाली होती. मांडवा बंदराजवळ बोट आली असता अचानक बोटीत बिघाड होऊन पाणी घुसू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू लागले. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना ही माहिती मिळताच त्यांनी सदगुरू कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यांना तातडीने पाठवून दिले. बोटीच्या खलाशांनी तातडीने जाऊन त्यांनी बुडणाऱ्या 88 जणांचे प्राण वाचवून त्यांना सुखरूप मांडवा बंदरात सोडले. बोट पोहचण्यास थोडा जरी उशीर झाला असता तर 88 जणांना जलसमाधी मिळाली असती. मात्र, बोटीचे खलाशी आणि पोलीस नाईक देवदूता सारखे पोहचल्याने प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचा - समुद्र किनारी लागली आग; चार बोटींसह लाखोंची मासळी जळून खाक

दरम्यान, मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांना मदत केली. तर बोट काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मराज सोनके यांनी सांगितले. या बोटीची क्षमता ही 50 ते 60 प्रवाशांची असतानाही अजिंठा प्रशासन नेहमी जास्त प्रवाशांची वाहतूक करत असतात. तर प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार नेहमीच प्रवाशांकडून होत असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून अजंठा प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असते. याकडे मेरिटाईम बोर्डही दुर्लक्ष करताना दिसत आहे.

Last Updated : Mar 14, 2020, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.