नवी मुंबई - पनवेलमधील कोनगाव येथील इंडिया बुल्स या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आले असून तेथील रुग्णांनी गोंधळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र संबंधित ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण ठेवले नाहीत. ही इमारत फक्त स्वॅब टेस्ट कलेक्शन म्हणून ठेवण्यात आली आहेत. तसेच या व्हायरल व्हिडिओचा पनवेल महानगर पालिकेशी काहीही संबंध नसून, हा व्हिडिओ खोटा असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.
कोनगाव येथील इंडिया बुल्स प्रकल्पातील इमारतीत पनवेल महानगरपालिकेच्या क्वारंटाईन सेंटरचे काम चालत असून, या इमारती पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. मात्र त्या ईमारतीत ठेवलेल्या पाॅझिटिव्ह पेशंटच्या बाबतीत गोंधळ झाल्याचे व्हिडिओ वृत्त काही माध्यमात पसरले होते. मात्र हे वृत्त पनवेल महानगरपालिकेशी संबंधित नसल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले. तसेच पनवेल मनपा क्षेत्रातील फक्त स्वॅब कलेक्शन सेंटर म्हणून त्या इमारतीत व्यवस्था केली असून अधिग्रहीत इमारतीत कोणतेही पाॅझिटिव्ह रुग्ण ठेवले जात नाहीत, असेदेखील पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे