रायगड - खालापूर शहरात मुंबई-पुणे हायवे जवळील डोंगरावर मंगळवारी दुपारच्या सुमारास एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. घटनेचा अधिक तपास खालापूर पोलीस करीत आहेत.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर गावातील तरुण वर्ग 13 एप्रिलला गुढीपाडवा असल्यामुळे डोंगरावरील साबाई मातेच्या मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवास करत असताना त्यांना वाटेमध्ये एका झाडाला अज्ञात व्यक्तीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे तरुणांनी खालापूर पोलीस ठाण्यात सर्व घटनेची माहिती दिली.
कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
ही घटना लक्षात घेता खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ठाण्यातील पथक घेऊन घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी तपास करत असताना मृत व्यक्तीच्या बाजूला सीमकार्ड नसलेला मोबाईल फोन आढळून आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून हा मृत व्यक्ती 45 वर्षीय कृष्णबंदू दीपक देबनाथ, नीमतळा-पश्चिम बंगालमधला असून पुणे या ठिकाणी नोकरी करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : धक्कादायक! संशयित कोरोनाग्रस्त इंजिनिअरची ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या