रायगड- खालापुर तालुक्यातील आडोशी येथील धरणा शेजारी असलेल्या फार्ममध्ये अफताब शेख, (30 रा. दिल्ली) हा तरुण मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. परंतु, 14 मार्च रोजी पहाटेपासून तो गायब होता. अफताबचे कपडे, पाकीट आडोशी धरणाशेजारी आढळून आले होते. अखेर आज (सोमवार) सकाळी त्याचा मृतदेह आडोशी धरणात आढळून आला. अपघातग्रस्त संस्थेच्या मदतीने अफताबचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पर्यटनासाठी आला होता अफताब
खालापूर तालुक्यातील ताकई आडोशी रोडवर असलेल्या धरणालगत तातुराम पाटील यांचे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये आय टी प्रोफेशनल लोक पर्यटनासाठी येत असतात. तसेच या ठिकाणी टेटं हाऊस पुरवले जातात. पुणे येथे आय टी कंपनीमध्ये कामाला असलेले चार मित्र पाटील यांच्या फार्महाऊसमध्ये पर्यटनासाठी आले होते. त्यातील अफताब शेख दि. 14 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वा. आपल्या टेटंमधून बाहेर पडला. सकाळी अफताब दिसेनासा झाल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याची शोधाशूध सुरू केली. फार्म हाऊस शेजारी असलेल्या धरणालगत अफताबचे कपडे, पाकीट आढळून आले.
हेही वाचा- उपराजधानी नागपुरात सात दिवसाच्या संचारबंदीला सुरुवात; रस्त्यांवर गर्दी कायम!
वेगवेगळ्या चर्चाना उधाण
त्यानंतर अफताबच्या मित्रांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. याबाबत खोपोली पोलीस स्टेशनमध्ये अफताबच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अफताब शेख यांच्या बेपत्ता होण्याबाबतचे गूढ वाढले असताना वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले होते. पोलिसांनी अपघात ग्रस्त संस्थेच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने धरणात अफताबची शोधाशोध केली मात्र, तो सापडला नाही. आज ( सोमवारी) सुद्ध त्याची शोधमोहीम सुरूच ठेवली. अखेर आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. अफताबचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सरू आहे.
हेही वाचा- संजय राऊत वाझेंना का पाठिशी घालताहेत? भाजपचा शिवसेनेवर निशाणा