ETV Bharat / state

२५ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक; ठाणे लाचलुचपत विभागाची कारवाई

नेरळ येथील ग्रामसेवकाला २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र गुदडे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.

author img

By

Published : Jul 30, 2019, 8:37 PM IST

२५ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक

रायगड - नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील एक बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नेरळ येथील ग्रामसेवकाला रंगेहात पकडण्यात आले. राजेंद्र गुदडे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळी ही कारवाई केली आहे.

२५ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक

रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणजे नेरळ. राजेंद्र गुदडे हे सुमारे ३ वर्षांपूर्वी नेरळ ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून रुजू झाले होते. नेरळ येथे राहणारे कामगार नेते विजय मिरकुटे यांच्या घराशेजारी बांधकाम करण्यासाठी सुषमा सुर्वे यांच्या नावाने बांधकाम परवानगी नेरळ ग्रामपंचायतीने दिली होती. या बांधकामाला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. मात्र, तरीही ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. ही परवानगी रद्द करण्यासाठी मिरकुटे हे ग्रामपंचायतीत नेहमी फेऱ्या मारत होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता.

शेवटी मिरकुटे यांनी ग्रामसेवक गुदडे यांची भेट घेतली. ग्रामसेवक गुदडे यांना भेटल्यावर मी परवानगी रद्द करतो. मात्र त्याबदल्यात २५ हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी मिरकुटे यांच्याकडे केली. हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर मिरकुटे यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यावर संबंधित प्रकाराची खात्री करून आज (३० जुलै) ठाणे लाचलुतपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी नेरळ येथे सापळा लावला.

या सापळ्यात ग्रामसेवक गुदडे हे २५ हजाराची लाच घेताना रंगेहात सापडले. लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने गुदडे यांना ताब्यात घेतले असून त्यांची आणखी कसून चौकशी केली जात आहे.

Intro:25 हजाराच्या लाचेप्रकरणी ग्रामसेवक लाच लुचपतच्या जाळ्यात

बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी मागितली होती लाच

रायगड : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील एक बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नेरळ येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. राजेंद्र गुदडे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाने सायंकाळी हि कारवाई केली आहे.Body:रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणजे नेरळ. राजेंद्र गुदडे हे सुमारे 3 वर्षांपूर्वी नेरळ ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून रुजू झाले होते. नेरळ येथे राहणारे कामगार नेते विजय मिरकुटे यांच्या घरा शेजारी बांधकाम करण्यासाठी सुषमा सुर्वे यांच्या नावाने बांधकाम परवानगी नेरळ ग्रामपंचायतीने दिली होती. या बांधकामाला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. मात्र तरीही ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. ही परवानगी रद्द करण्यासाठी मिरकुटे हे ग्रामपंचायतीत नेहमी फेऱ्या मारत होते. मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता.
Conclusion:शेवटी मिरकुटे यांनी ग्रामसेवक गुदडे यांची भेट घेतली. ग्रामसेवक गुदडे यांना भेटल्यावर मी परवानगी रद्द करतो मात्र त्याबदल्यात 25 हजार रुपयांची मागणी मिरकुटे यांच्याकडे केली. सगळा प्रकार लक्षात आल्यावर मिरकुटे यांनी या प्रकाराची ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यावर संबंधित प्रकाराची खात्री करून आज रोजी ठाणे लाचलुतपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी नेरळ येथे सापळा लावला.

या सापळ्यात ग्रामसेवक गुदडे हे 25 हजाराची लाच घेताना रंगेहात सापडले. लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने गुदडे यांना ताब्यात घेतले असून त्यांची आणखी कसून चौकशी केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.