ETV Bharat / state

अडीच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी अटकेत; अलिबाग एसीबीची कारवाई - अलिबाग लाच लुचपत प्रतिबंधक विभाग

तलाठी मुरुडकर यांनी वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले.

अडीच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी अटकेत; अलिबाग एसीबीची कारवाई

author img

By

Published : Oct 26, 2020, 8:43 PM IST

रायगड - वडिलोपार्जित जागेवर वारस नोंद करून नवीन सातबारा देण्यासाठी मगितलेल्या लाचेप्रकरणी वरडे सजा येथील तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. मनोज लक्ष्मण मुरुडकर (55) असे पकडलेल्या तलाठीचे नाव आहे. अडीच हजारांची लाच स्वीकारताना अलिबाग लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

तक्रारदार यांची अलिबाग तालुक्यातील वरंडे गावात वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार हे वरंडे येथील तलाठी मनोज मुरुडकर यांच्याकडे गेले होते. तलाठी मुरुडकर यांनी वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदारांनी याबाबत अलिबाग उपविभागीय लाचलुचपत कार्यालयात येऊन तलाठीविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागामार्फत सापळा रचला होता. आरोपी मुरुडकर हे आपल्या कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. आरोपी मुरुडकर यांना उद्या (मंगळवार) अलिबाग न्यायालयात हजर केले जाणार आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किशोर साळे, उपनिरीक्षक घरत, दीपक मोरे, सूरज पाटील, जितेंद्र पाटील यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.