रायगड - खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात तटकरे यांना दाखल करण्यात आलेले आहे. लवकरच मी जनतेच्या सेवेत रुजू होईन, असा संदेश त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.
खासदार सुनील तटकरे हे कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून तसेच निसर्ग चक्रीवादळ संकटातही कायम जनतेच्या संपर्कात आहेत. रोज सुरू असलेल्या दौऱ्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेऊन ते जनतेची सेवा करीत होते. मात्र अखेर त्यांना कोरोनाने गाठलेच.
खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी करून घेतली. कोरोना तपासणीत त्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तटकरे यांना मुंबई मधील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी - तटकरे
माझी प्रकृती ही उत्तम असून जनतेच्या आशीर्वादाने लवकरच मी पुन्हा सक्रिय होईन, असे तटकरे यांनी म्हटले आहे. संपर्कात आलेल्यांनीही तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील तटकरे यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - अतिवृष्टीचा फटका..! दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडू खातोय भाव, नवरात्रौत्सवात ग्राहक नाराज
हेही वाचा - आमदार महेंद्र दळवी यांची मिठाई, फळे, गुळाने केली तराजू तुला